Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP School Theek Karo Latur: बाहेरच्या शाळेतून विद्यार्थी आणले….; अभिजीत दिपकेंनी केली महापालिकेच्या शाळेची पोलखोल

CJP News: राज्यातील सरकारी शाळांच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित करत अभिजीत दिपके यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमावर जोरदार टीका केली आहे. “आमदार फोडण्यापेक्षा शाळा सुधारा,” असा टोला त्यांनी सरकारला लगावला.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 21, 2026 | 10:46 AM
Latur Municipal School News

Latur Municipal School News

Follow Us
Follow Us:
  • ‘स्कूल ठीक करो’ अभियानांतंर्गत सीजेपीतर्फे लातूरमधील अण्णा भाऊ साठे मनपा शाळेची पाहणी.
  • तपासणीदरम्यान दुसऱ्याच शाळेतील विद्यार्थ्यांना वर्गात बसवल्याचा अभिजीत दीपके यांचा दावा.
  • विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच नाहीत, जमिनीवरच सुरू आहे शिक्षण.
Latur Municipal School: कॉकरोच जनता पार्टीच्या  स्कूल ठिक करो अभियानादरम्यान लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूरमधील महापालिकेच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शाळेच्या पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांना या शाळेत आणून बसवण्यात आल्याचा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी महापालिकेकडे केली आहे. तसेच कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावरदेखील शेअर केला आहे

मिळालेल्या माहितीनुसार, सीजेपीचे (CJP) राज्यासह संपूर्ण देशभरात स्कूल ठिक करो अभियान सुरू आहे. या अभियानादरम्यान अभिजीत दिपके यांनी अण्णाभाऊ साठे या शाळेला भेट देत तेथील शैक्षणिक व भौतिक सुविधांची पाहणी केली. या पाहणीवेळी विद्यार्थ्यांना अद्यापही बेंच नसून ते जमिनीवर बसूनच शिक्षण घेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांनी संवाद साधताना शाळेतील पाण्यापासून शौचालयांच्या सुविधांबाबत प्रश्न विचारले असता विद्यार्थ्यांनी ही शाळाच आपली नसल्याचे सांगितले, असा दावा अभिजीत दिपके यांनी केला.

Kurla Accident: कुर्ल्यात मध्यरात्री मोठी दुर्घटना! उंचावरील क्रेन अचानक घरावर कोसळली, अपघातात 8-10 जण जखमी

शाळाभेटीदरम्यान दुसऱ्या शाळेतील विद्यार्थी या शाळेत आणून बसण्याचा प्रकार लक्षात येताच दिपके यांनी तातडीने महापालिका उपायुक्त वसुधा फड यांच्याशी संपर्क साधला. अभिजीत दिपके यांनी वसुधा फड यांनी संबंधित शाळेतील सर्व परिस्थिती सांगितली आणि या परिस्थितीची चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

 

” आम्ही पाहणीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाहेरच्या शाळेतील विद्यार्थी इथे आणण्यात आले. स्वत:च्या चुका लपवण्यासाठी लहान मुलांचा वापर करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. शाळेत फक्त दोन वर्ग आणि दोनच शिक्षक आहेत. शिवाय शाळेत मूलभूत सुविधांचेही प्रश्न आहेत, या सर्व गोष्टींकडे त्यांनी लक्ष वेधत स्थानिक महापालिका प्रशासनाकडे शाळेची स्थितीत तातडीने सुधारण्यात यावी, अशी मागणी केली.

याशिवाय, शाळेत डमी विद्यार्थी बसवल्याच्या आरोपाची चौकशी करून त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, तसेच शाळेतील आवश्यक सुविधांकडेही लक्ष दिले जाईल, असे आश्वासन यावेळी उपायुक्त वसुधा फड यांनी दिपके यांना दिले. या प्रकरणाची प्रशासनाकडून चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीत नेमके काय समोर येते आणि त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला

–  आमदार फोडण्यापेक्षा शाळा सुधारा- अभिजीत दिपकेंचा टोला

राज्यातील सरकारी शाळांच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित करत  अभिजीत दिपके यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमावर जोरदार टीका केली आहे. “आमदार फोडण्यापेक्षा शाळा सुधारा,” असा टोला त्यांनी सरकारला लगावला.

सरकारी आणि महापालिका शाळांमधील मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी दिपके यांनी केली. राजकीय घडामोडींवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो. त्याऐवजी हा निधी सरकारी शाळांच्या सुविधा सुधारण्यासाठी वापरल्यास गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाची संधी मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.

 

 

 

Web Title: Latur news latur municipal school scandal other school students brought for inspection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP Protest
  • education news
  • Latur news
  • Student Protest

संबंधित बातम्या

Bombay HC on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कोर्ट संतापलं; ‘विद्यार्थी समाजकंटक नाहीत, त्यांना आंदोलनाचा अधिकार आहे’
1

Bombay HC on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कोर्ट संतापलं; ‘विद्यार्थी समाजकंटक नाहीत, त्यांना आंदोलनाचा अधिकार आहे’

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी
2

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी

Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून काँग्रेसने सरकारला घेरलं, आदिवासी विद्यार्थ्यांचा लढा पेटला!
3

Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून काँग्रेसने सरकारला घेरलं, आदिवासी विद्यार्थ्यांचा लढा पेटला!

Devendra Fadnavis : ‘संविधान हातात घेऊन संविधानालाच नकार..,’ दिल्लीतील आंदोलनावरून फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
4

Devendra Fadnavis : ‘संविधान हातात घेऊन संविधानालाच नकार..,’ दिल्लीतील आंदोलनावरून फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.