Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून काँग्रेसने सरकारला घेरलं, आदिवासी विद्यार्थ्यांचा लढा पेटला!

Tribal students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी नाकारल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावाही केला आहे. राहुल गांधी यांनीही विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 06, 2026 | 05:33 PM
Tribal Student Protest Azad Maidan

Tribal Student Protest Azad Maidan

Follow Us
Follow Us:
  • आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी नाकारल्याचा काँग्रेसचा आरोप
  • नाशिकहून मुंबईत आदिवासी विद्यार्थ्यांचा लॉन्ग मार्च
  • विद्यार्थ्यांच्या मागण्यांना राहुल गांधींचा पाठिंबा
 

मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून ( Tribal Students Protest) राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी नाकारून सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला असताना सरकार आणि पोलिसांकडून विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी केली जात असल्याचा दावा काँग्रेसने केला.

आदिवासी विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी द्यावी किंवा राज्यपालांची भेट घडवून द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, या मागणीवरून पोलिसांनी विद्यार्थ्यांना त्रास दिल्याचा आणि अखेर त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय?

आदिवासी विद्यार्थ्यांनी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच आदिवासी विकास मंत्र्यांचा राजीनामा आणि आदिवासी आयुक्तांची बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis : ‘संविधान हातात घेऊन संविधानालाच नकार..,’ दिल्लीतील आंदोलनावरून फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, सेंट्रल किचनमधून मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा सुधारावा, यासह इतर मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, मागील दोन वर्षांत आश्रमशाळांमधील 600 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, या दाव्याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.

नाशिकहून मुंबईत लॉन्ग मार्च

आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी नाशिकहून मुंबईच्या दिशेने लॉन्ग मार्च काढला. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या आंदोलनाला 48 दिवस झाले आहेत.

मुंबईच्या जवळ हा लॉन्ग मार्च आल्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आल्याचंही काँग्रेसकडून सांगण्यात आलं.

टिळक भवनातील कारवाईवरून काँग्रेस आक्रमक

काँग्रेसने या विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था दादर येथील टिळक भवन कार्यालयात केली होती. मात्र, मध्यरात्री पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

पोलिसांनी पक्ष कार्यालयात प्रवेश करून विद्यार्थ्यांना धमकावल्याचा आरोपही काँग्रेसने केला. टिळक भवनाबाहेर मोठ्या संख्येने पोलीस आणि वाहनांचा ताफा तैनात करण्यात आल्याचा दावा पक्षाने केला आहे.

पक्ष कार्यालयात पोलिसांनी प्रवेश का केला, असा सवाल काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला. पोलिसांकडून याबाबत समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे.

“काँग्रेस आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी”

भाजप सरकार पोलिसांना पुढे करून दडपशाही करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ही दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही काँग्रेस नेत्यांनी दिला. काँग्रेस पक्ष आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, पुढेही त्यांच्या लढ्याला पाठिंबा देणार असल्याचं पक्षाने स्पष्ट केलं.

राहुल गांधींचाही विद्यार्थ्यांना पाठिंबा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. या लढ्यात काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांसोबत असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं.

दरम्यान, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या, पोलिसांची भूमिका आणि काँग्रेसच्या आरोपांवरून राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

INDIA Alliance EC March: भाजपला नेस्तनाबूत करणार, मोदी, शाह, भागवतांनी देशद्रोह केला; राहुल गांधींचे खुले आव्हान

Web Title: Tribal students protest mumbai congress bjp government azad maidan vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • Congress
  • Rahul Gandhi
  • Student Protest
  • Tribal Community

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : ‘संविधान हातात घेऊन संविधानालाच नकार..,’ दिल्लीतील आंदोलनावरून फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
1

Devendra Fadnavis : ‘संविधान हातात घेऊन संविधानालाच नकार..,’ दिल्लीतील आंदोलनावरून फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

INDIA Alliance EC March: भाजपला नेस्तनाबूत करणार, मोदी, शाह, भागवतांनी देशद्रोह केला; राहुल गांधींचे खुले आव्हान
2

INDIA Alliance EC March: भाजपला नेस्तनाबूत करणार, मोदी, शाह, भागवतांनी देशद्रोह केला; राहुल गांधींचे खुले आव्हान

Rohit Pawar MPSC Protest Pune : आंदोलनावरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना थेट पाडण्याचं चॅलेंज दिलं
3

Rohit Pawar MPSC Protest Pune : आंदोलनावरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना थेट पाडण्याचं चॅलेंज दिलं

Rahul Gandhi Delhi Protest: ज्ञानेश, इट्स डन ब्रो!; राहुल गांधींचे ‘Gen-Z’ स्टाईल पोस्टर; दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात मोठा राडा
4

Rahul Gandhi Delhi Protest: ज्ञानेश, इट्स डन ब्रो!; राहुल गांधींचे ‘Gen-Z’ स्टाईल पोस्टर; दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात मोठा राडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.