फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील तरुणांसाठी एक मोठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. राज्यात जर उमेदवार नोकरीच्या शोधात इथेतिथे भटकत असतील तर त्यांना आता त्याची काहीच गरज नाही आहे. कारण राज्ज्य शासनाने एका मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) मध्ये एकूण २९० पदांची भरती जाहीर करण्यात आली असून ही भरती प्रक्रिया आयबीपीएस (IBPS) मार्फत पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या भरतीची सविस्तर जाहिरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mjp.maharashtra.gov.in प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. त्यामुळे या भरतीबाबत ठळक माहिती तेथे पुरवण्यात येईल.
या भरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी सर्वाधिक १४४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), लिपिक, आणि इतर तांत्रिक व प्रशासकीय पदांवर देखील भरती केली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे राज्यातील पात्र अभियंते आणि इतर उमेदवारांना शासन सेवेत प्रवेशाची सुवर्णसंधी मिळणार आहे. सदर क्षेत्रात अनुभव आहे तर वाट कसली पाहताय? वेळ न दवडता लवकरच अर्ज करून घेण्यात यावे.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राज्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा आणि स्वच्छता योजना राबवते. या योजना अधिक प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी तांत्रिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची गरज होती. त्यामुळे आयबीपीएसच्या माध्यमातून पारदर्शक व गुणवत्ताधारित भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. अधिकृत जाहिरातीत शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आरक्षण निकष, तसेच अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख यासंदर्भातील सर्व माहिती देण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरतीची सविस्तर माहिती व ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या भरतीमुळे राज्यातील पाणीपुरवठा प्रकल्पांना गती, तसेच स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.






