Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ शाळांचं होणार ऑडिट; शाळांच्या दुरवस्थेनंतर शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था खालावली आहे. ही परिस्थिती पाहता शिक्षण विभागाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील या शाळांचं 'स्ट्रक्चरल ऑडिट' करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 24, 2026 | 03:22 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था खालावली
  • शिक्षण विभागाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय
  • दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी
Maharashtra School Audit  : शिक्षण हा प्रत्येकाचा प्रार्थमिक हक्क आहे. पण प्रत्येकापर्यंत तो हक्क पोहोचतो किंवा तो परवडतोच असं नाही. म्हणून सरकारने मोफत शिक्षणाची सोय केली. सरकारी शाळा उभारल्या. पण या शाळांकडे दुर्लक्ष होत आहे. भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था खालावली आहे. ही परिस्थिती पाहता शिक्षण विभागाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील या शाळांचं ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शिक्षण क्षेत्रासाठी अधिक निधी उपलब्ध करून देऊन शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.

RTE विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारल्यास शाळांवर होणार कठोर कारवाई; शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा थेट इशारा

आमदार रईस शेख यांनी वेधले लक्ष

भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या शाळांच्या दुरवस्थेबाबत आमदार रईस शेख यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांनी शाळांच्या सुधारणेसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.

विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न

मंत्री भुसे म्हणाले की, “शाळांमधील विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. जर कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेने मागणी केली, तर त्यांना नववी आणि दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची तसेच आवश्यक शिक्षकांची नियुक्ती करण्याची परवानगी शासन स्तरावरून तात्काळ दिली जाईल.” तसेच शिक्षण क्षेत्रात अधिक गुंतवणूक होणे गरजेचे असून, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अतिरिक्त निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

भिवंडीतील शाळांची सद्यस्थिती

या चर्चेदरम्यान राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या शाळांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सद्यस्थितीत महानगरपालिकामार्फत ८६ प्राथमिक आणि ११ माध्यमिक अशा एकूण ९७ शाळा चालवल्या जातात. यापूर्वी या शाळा ५१ इमारतींमध्ये भरत होत्या. मात्र, त्यातील ५ इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्याने त्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत उर्वरित ४६ इमारतींमध्ये सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत शाळा भरवल्या जात आहेत. त्यानंतर या परिस्थितीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि अनुदानित शाळांचे ऑडिट होणार आहे.

दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी

धोकादायक ठरलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. शाळांच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, अनेक कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. यासोबतच, महानगरपालिकांनी त्यांच्या बजेटमध्ये शिक्षणासाठी स्वतंत्र निधी राखून ठेवावा, याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचा विचार सरकार करत असल्याचेही राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.

लाखोंचं बक्षीस, लॅपटॉप आणि नवी ओळख… 12 वीच्या टॉपर्सना मिळणार आता ‘हे’ मोठे फायदे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Web Title: Maharashtra school audit bhiwandi school condition dada bhuse update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • dada bhuse
  • education news
  • Education News in Marathi
  • Minister Dada Bhuse

संबंधित बातम्या

Admit Card: MPEST ने ग्रुप 2 उपगट 4 अंतर्गत पटवारी आणि इतर परीक्षांसाठी जारी केले प्रवेशपत्र
1

Admit Card: MPEST ने ग्रुप 2 उपगट 4 अंतर्गत पटवारी आणि इतर परीक्षांसाठी जारी केले प्रवेशपत्र

NLSIU Fellowship: पदवीधरांना महिन्याला मिळणार रू. 50000 ची फेलोशिप, 30 ऑक्टोबरपर्यंत करू शकता अर्ज
2

NLSIU Fellowship: पदवीधरांना महिन्याला मिळणार रू. 50000 ची फेलोशिप, 30 ऑक्टोबरपर्यंत करू शकता अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.