Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidarbha School: विदर्भातील शाळांबाबत नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय, आता ‘या’ तारखेलाच सुरू होणार शाळा, हायकोर्टाने खडसावले

Vidarbha School News: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्षण विभागाचा आदेश रद्द केला आहे. आता विदर्भातील शाळा १५ किंवा २२ जून ऐवजी थेट ३० जून २०२६ रोजी सकाळच्या सत्रात सुरू होणार आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 10, 2026 | 10:03 PM
विदर्भातील शाळांबाबत नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय (Photo Credit- X)

विदर्भातील शाळांबाबत नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • विदर्भातील शाळांबाबत नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय
  • आता ‘या’ तारखेलाच सुरू होणार शाळा
  • हायकोर्टाने खडसावले
Vidarbha School News: विदर्भातील शाळा कधी सुरू होणार, यावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मोठ्या वादावर अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निकाल देत पडदा टाकला आहे. नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या शिक्षण विभागाचे २८ मार्च आणि ९ जून रोजीचे दोन्ही वादग्रस्त आदेश थेट रद्द (Quashed) केले आहेत. हायकोर्टाच्या या ऐतिहासिक निर्णयानंतर आता विदर्भातील सर्व शाळा अधिकृतपणे ३० जून २०२६ रोजीच सुरू होणार आहेत. नवनवीन परिपत्रके काढून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या शिक्षण विभागाला आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना नागपूर खंडपीठाने आजच्या सुनावणीदरम्यान चांगलेच सुनावले असून, “आधीच्या जीआर (GR) च्या विरोधात जाऊन कोणतीही कृती करू नका,” असे कडक शब्दांत बजावले आहे.

नेमका वाद काय होता?

शिक्षण विभागाने २८ मार्च रोजी एक आदेश जारी करून विदर्भासह संपूर्ण राज्यातील शाळा १५ जून रोजी सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, विदर्भातील कडक उन्हाळा आणि वाढते तापमान लक्षात घेता १५ जून रोजी मान्सून दाखल झालेला नसतो आणि उष्णतेची लाट कायम असते. विदर्भातील शाळांसाठी आधीपासूनच २६ जून ही तारीख निश्चित असताना शिक्षण विभागाने सर्वांना सरसकट १५ जूनची तारीख लादल्यामुळे विदर्भातील शिक्षक संघटना, पालक आणि शिक्षणतज्ज्ञांनी याला तीव्र विरोध दर्शवला होता.

सर्व बाजूने टीका झाल्यानंतर शिक्षण विभागाने काल, म्हणजेच ९ जून रोजी घाईघाईने एक सुधारित आदेश काढला होता. यामध्ये विदर्भातील शाळा १५ ऐवजी २२ जूनपासून सुरू होतील आणि २२ ते ३० जून दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी केवळ सकाळच्या सत्रात शाळा भरवल्या जातील, असे म्हटले होते.

शिक्षण विभाग ‘अ‍ॅक्शन मोड’वर; पुणे विभागातील अनधिकृत शाळांना लागणार कुलूप

मात्र, या प्रकरणावर नागपूर खंडपीठात अंतिम सुनावणी झाली. तेव्हा न्यायमूर्तींनी शिक्षण विभागाला धारेवर धरले. “विदर्भासाठी आधीच २६ जूनची तारीख ठरलेली असताना, दररोज नवनवीन आदेश काढून विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या डोक्यातील गोंधळ का वाढवला जातोय?” असा संतप्त सवाल कोर्टाने उपस्थित केला आणि ९ जूनचा आदेशही रद्द ठरवला.

३० जून रोजी शाळा सुरू; १ जुलैपासून नियमित वर्ग भरणार

विदर्भातील मान्सूनचे आगमन आणि तापमानाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. विदर्भात मान्सून पोहोचण्यासाठी अद्याप काही दिवसांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे कडक उन्हात मुलांना शाळेत पाठवणे आरोग्यासाठी घातक ठरले असते. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे आता विदर्भातील लाखो विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर; एकूण 10 शाळांची नावे समोर

Web Title: Major decision by the nagpur bench regarding schools in vidarbha schools will now open only on this date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 10:03 PM

Topics:  

  • Career News
  • School news
  • vidharbha

संबंधित बातम्या

खासगी शिकवणी केंद्रांसाठीच्या नव्या कायद्यावर 11 हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
1

खासगी शिकवणी केंद्रांसाठीच्या नव्या कायद्यावर 11 हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Mumbai University Recruitment 2026:  प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार!  मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू
2

Mumbai University Recruitment 2026: प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार! मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू

Management Quota Admission 2026-27: मॅनेजमेंट कोट्यात मनमानीला ब्रेक! CET सेलची करडी नजर, नेमकं प्रकरण काय?
3

Management Quota Admission 2026-27: मॅनेजमेंट कोट्यात मनमानीला ब्रेक! CET सेलची करडी नजर, नेमकं प्रकरण काय?

School Bag Weight Guidelines: दप्तराचं ओझं होणार हलकं! विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, शाळांसाठी नवे वजनाचे नियम
4

School Bag Weight Guidelines: दप्तराचं ओझं होणार हलकं! विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, शाळांसाठी नवे वजनाचे नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.