
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
उमेदवारांची निवड करताना कोणतीही मुलाखत होणार नाही तर केवळ ‘संगणक-आधारित चाचणी’ म्हणजे CBT च्या आधारे ही निवड केली जाणार आहे. जर तुम्हाला खाण क्षेत्रात म्हणजे मायनिंग सेक्टरमध्ये काम करायाचं आहे तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.
MCL साठी अर्ज करण्याची प्रक्रिया १६ मार्च २०२६ रोजी सुरू झाली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ६ एप्रिल २०२६ ही आहे. महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या तारीख जवळ येत आहे त्यामुळे शेवटच्या काही दिवसांत website वर traffic मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असते, ज्यामुळे सर्व्हरचा वेग मंदावू शकतो. त्यामुळे, जर तुम्ही अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करणं गरजेचं आहे.
MCL ने एकूण ६६४ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये ‘ज्युनियर ओव्हरमॅन’ साठी १९२ पदे, ‘मायनिंग सरदार’ साठी ४४८ पदे आणि ‘सर्वेअर’ साठी ४० पदांचा समावेश आहे. यापैकी, ‘मायनिंग सरदार’ या पदासाठी रिक्त जागांची संख्या सर्वात जास्त आहे. जर तुमच्याकडे खाणकामाशी संबंधित आवश्यक पात्रता आणि प्रमाणपत्रे असतील, तर तुमची निवड होण्याची शक्यता खूपच जास्त आहे.
या पदांसाठी उमेदवारांची निवड केवळ ‘संगणक-आधारित चाचणी’ म्हणजे CBT च्या आधारे केली जाणार आहे. CBT मधील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असतील. या परीक्षेत नकारात्मक गुणपद्धती म्हणजेच negative marking नसणार आहे. त्यामुळे गुण कपातीच्या पद्धतीचे नियम लागू होणार नाही.; उमेदवारांची निवड यादी shortlist करण्यासाठी त्यांचे वय, शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक प्रमाणपत्रांचा विचार केला जाणार आहे. आणि त्यानुसार लिस्ट काढली जाणार आहे.
1. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे; सुरुवात करण्यासाठी, सर्वप्रथम MCL च्या अधिकृत संकेतस्थळाला https://mahanadicoal.in/ या लिंकला भेट द्या.
2. त्यानंतर, Homepage वरील ‘Careers’ हा ऑपशन निवडा.
3. आता, “MCL Recruitment 2026 for Junior Overman, Mining Sirdar, and Surveyor” या शीर्षकाची लिंक शोधा.
4. त्या लिंकमध्ये दिलेल्या सूचनेचं काळजीपूर्वक वाचन करा आणि “Apply Online” या पर्यायावर क्लिक करा.
5. तुमची नोंदणी (Registration) पूर्ण करा आणि अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक, शैक्षणिक तसेच अनुभवाशी संबंधित माहिती अचूकपणे भरा.
6. त्यानंतर, आवश्यक कागदपत्रे, छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा.
7. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, अर्जाचे फी भरा.
8. शुल्क भरल्यानंतर, अर्ज सादर करण्यापूर्वी संपूर्ण अर्जाची नीट तपासणी करा आणि भविष्यातील ही प्रत लागू शकते त्यामुळे त्याची एक प्रत स्वतःकडे काढून ठेवा.