Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCM CET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना जाहीर; ‘या’ तारखेला सुरू होणार परीक्षा

परीक्षा केंद्रावर आल्यानंतर, तुमच्या बोटांचे ठसे आणि फोटो घेऊन तुमची ओळख पडताळली जाईल. परीक्षेचे स्वरूप ही परीक्षा एकूण १८० मिनिटांची असून ती दोन भागांत विभागलेली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 09, 2026 | 05:58 PM
PCM CET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना जाहीर; ‘या’ तारखेला सुरू होणार परीक्षा
Follow Us
Follow Us:

पीसीएम सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना जाहीर
११ एप्रिल पासून एमएचटी सीईटी पीसीएम समूहाची प्रवेश परीक्षा सुरु
विद्यार्थ्यांनी केंद्रावर वेळेत पोहोचणे आवश्यक

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शनिवार, दि. ११ एप्रिल पासून एमएचटी सीईटी पीसीएम समूहाची प्रवेश परीक्षा (Career) सुरु होत आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या निर्णयानुसार यावर्षीपासून प्रथमच राज्यातील एमएचटी पीसीएम समूह व पीसीबी समूहाच्या विद्यार्थ्याना सीईटीच्या दोन संधी मिळत आहेत.

यातील पीसीएम समूहाच्या पहिल्या संधीची सीईटी दिनांक ११  ते २० एप्रिल २०२६ रोजी होत आहे. या सीईटी प्रवेश परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना सीईटी कक्षानी जाहीर केल्या आहेत.

केंद्रावर वेळेत पोहोचणे आवश्यक

सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते तुमच्या प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्रावर पोहचण्याची वेळ नमूद आहे. नमूद केलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रावर पोहोचणे अत्यंत महत्वाचे आहे. परीक्षेकरीता गेट बंद होण्याच्या वेळेनंतर विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात कुठल्याही परीस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

परदेशस्थ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली; विद्यार्थी आर्थिक संकटात

तीन महत्त्वाच्या गोष्टी सोबत असल्याची खात्री करा

-तुमचे प्रिंट केलेले प्रवेशपत्र ज्यावर दिलेल्या ठिकाणी तुमचा फोटो चिकटवलेला असावा आणि त्यावर तुमची स्वाक्षरी असावी.

-प्रवेशपत्रावर दिलेल्या यादीमधील एक मूळ आणि वैध ओळखपत्र सोबत असावे.ओळखपत्राची छायाप्रत किंवा सत्यप्रती वर प्रवेश दिला जाणार नाही.

-ज्या उमेदवारांना लेखनिक किंवा अतिरिक्त वेळेची गरज आहे, त्यांनी अपंगत्व प्रमाणपत्र, कार्ड (मुळ प्रमाणपत्र) पडताळणीसाठी सोबत ठेवावे.

बायोमॅट्रिक्स आणि लॉगिन

परीक्षा केंद्रावर आल्यानंतर, तुमच्या बोटांचे ठसे आणि फोटो घेऊन तुमची ओळख पडताळली जाईल. परीक्षेचे स्वरूप ही परीक्षा एकूण १८० मिनिटांची असून ती दोन भागांत विभागलेली आहे. पहिले ९० मिनिटे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांसाठी असतील. ठिक ९० मिनिटे पूर्ण झाल्यावर हा विभाग आपोआप ‘सबमिट’ होईल., त्यानंतर पुढील ९० मिनिटे गणित विषयासाठी वेळेची गणना सुरू होतील.

Parbhani News : सर्व शाळांची होणार पट-पडताळणी; ‘या’ कालावधीत केली जाणार तपासणी

परीक्षेची भाषा

आपल्या परीक्षेची भाषा जर मराठी, उर्दू असल्यास अशा परीक्षेतील प्रश्नासंदर्भात काही विसंगती असल्यास प्रश्नपत्रिकेची इंग्रजी आवृत्ती अंतिम राहील. चांगली तयारी करावी व सर्व नियमांचे पालन करावे, महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सर्व परीक्षार्थींना परीक्षेसाठी शुभेच्छा! अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या: www.mahacet.org

 

Web Title: Mht cet pcm group entrance exam from april 11 biometric entry career marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 05:58 PM

Topics:  

  • Career News
  • CET Exam
  • Students

संबंधित बातम्या

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या २,४२१ पदांसाठी मेगाभरती; ‘पवित्र’ पोर्टलवरून थेट…
1

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या २,४२१ पदांसाठी मेगाभरती; ‘पवित्र’ पोर्टलवरून थेट…

MCC Round 1 Result: NEET UG 2026चा पहिला सीट अलॉटमेंट निकाल जाहीर; त्रुटींवर हरकतीसाठी MCCचे पोर्टल खुले
2

MCC Round 1 Result: NEET UG 2026चा पहिला सीट अलॉटमेंट निकाल जाहीर; त्रुटींवर हरकतीसाठी MCCचे पोर्टल खुले

Career News: पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर
3

Career News: पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

TET पुन्हा लांबणीवर! जूनचा पेपर फुटला अन् आता डिसेंबर उजाडणार; विद्यार्थ्यांचा संताप!
4

TET पुन्हा लांबणीवर! जूनचा पेपर फुटला अन् आता डिसेंबर उजाडणार; विद्यार्थ्यांचा संताप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.