फोटो सौजन्य - Social Media
तंत्रज्ञानाचा विकास फार वेगाने होत आहे. या विकासाच्या वाटेत अनेकांच्या नोकऱ्या जाणार कि काय? असा प्रश्न बहुतेक ज्यांना पडला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये होणारा विकास अनेकांच्या नोकऱ्यांवर प्रश्नचिन्ह करणार असल्याची चर्चा तर सुरुवातीपासूनच सुरु आहे. अशामध्ये अनेक जण नक्कीच तणावामध्ये आले आहेत. फक्त कर्मचारी वर्ग नव्हे तर एखाद्या ठरविक क्षेत्रात शिक्षण घेणारे विद्यार्थीही त्यांच्या भविष्यबाबत विचारात आहेत. त्यांना असे वाटते कि तंत्रज्ञानात होणार विकास त्याच्या क्षेत्रावर हावी होईल आणि ज्या कामासाठी त्यांना नोकरी दिली जाईल त्या ठिकाणी तंत्रज्ञानाचे नवीन अविष्कार कामी येणार आहेत.
विद्यार्थी तसेच कर्मचारी वर्गांमध्ये पडणारे हे सर्व प्रश्न व्यर्थ नाहीत. विकासाच्या या टप्प्यात पडणारे हे प्रश्न साहजिक आहेत. या अनुसरून वर्ल्ड इकॉनॉमिक फॉर्मचा फ्यूमर ऑफ जॉब रिपोर्ट २०२५ जाहीर करण्यात आला आहे. मुळात, या रिपोर्टमध्ये या दशकातील करिअर क्षेत्रासंदर्भात अनेक महत्वाचे मुद्दे नोंदवण्यात आले आहेत. येत्या ५ वर्षात म्हणजेच २०३० पर्यंत किती नवीन नोकऱ्या तयार होतील? तसेच किती नवीन नोकऱ्या संपतील या सर्व बाबी या रिपोर्टमध्ये नमूद आहेत. मुळात, याचा इच्छुकांना आढावा घेता येणार आहे.
येत्या ५ वर्षात एकूण ९२ मिलियन नोकऱ्या संपण्याच्या दिशेने आहेत. याला कदाचित तंत्रज्ञानातील प्रगतीही जबाबदार आहे. पण याचा दोष पूर्णता विकासावर टाकणे योग्य नाही. महत्वाची बाब म्हणजे येत्या ५ वर्षात १७० मिलियन नव्या नोकऱ्या येणार आहेत. याचा अर्थ असा आहे कि नोकऱ्या किंवा कामे कधी जात नसतात त्या नव्या रूपाने येत असतात. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक २० जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. तसेच ही बैठक २५ जानेवारी पर्यंत आयोजित करण्यात येणार आहे.
परंतु, या रिपोर्टनुसार, अनेक क्षेत्रात बदल होणार आहेत. व्यवसाय क्षेत्रात काही बदल दिसून येणार आहेत, तसेच सेवा क्षेत्रातही काही प्रमाणात बदल दिसून येणार आहे. तर काही क्षेत्रात काहीच बदल दिसून येणार नाही आहे. यामध्ये शेतमजूर, मजूर, सॉफटवेअर डेव्हलोपर्स, ऍप्लिकेशन डेव्हलोपर्स, हलक्या वाहनांचे चालक तसेच नर्सिंग प्रोफेशनल्स यांचा समावेश आहे. तसेच वेटर्स, फिनिशर्स, प्रोजेक्ट मॅनेजर्स, विद्यापीठांमधील शिक्षकवर्ग, उच्च शिक्षण क्षेत्रातील शिक्षण तसेच उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षक यांच्या नोकऱ्यांवरही काही परिणाम जाणवणार नाही असे रिपोर्टचे म्हणणे आहे.