Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News : शैक्षणिक वर्ष सुरू, पण अनधिकृत शाळांची माहिती अद्याप नाही; विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत चिंता

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 18, 2026 | 05:59 PM
शैक्षणिक वर्ष सुरू, पण अनधिकृत शाळांची माहिती अद्याप नाही; विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत चिंता

शैक्षणिक वर्ष सुरू, पण अनधिकृत शाळांची माहिती अद्याप नाही; विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत चिंता

Follow Us
Follow Us:
  • मीरा-भाईंदरमध्ये अनधिकृत शाळांची यादी अद्याप जाहीर नाही
  • मनविसे आणि युवा सेनेचा आक्रमक इशारा
  • अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्याची तातडीची मागणी
विजय काते, भाईंदर : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून शहरातील अनधिकृत शाळांची यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नसल्याने पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आणि युवा सेनेने तीव्र नाराजी व्यक्त करत शिक्षण विभागाला पत्रव्यवहार करून तातडीने यादी प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे.

दरवर्षी महाराष्ट्रातील विविध महानगरपालिका आणि शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली जाते. त्यामुळे पालकांना आपल्या पाल्यांच्या शिक्षणाबाबत योग्य निर्णय घेण्यास मदत होते. तसेच अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेण्यापासून विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे संरक्षण होते.

‘नीट’ परीक्षेसाठी ड्रोनचा पहारा आणि कडक पोलीस बंदोबस्त; १७,७३४ विद्यार्थी देणार परीक्षा, कोचिंग क्लासेसचे पेपर्सही तपासणार

मात्र, मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडून अद्याप अशी कोणतीही यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश घेतल्यानंतर जर संबंधित शाळा अनधिकृत असल्याचे पुढे समोर आले, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

मनविसे आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर अनेक महिने उलटल्यानंतर अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात काहीही अर्थ नाही. त्यावेळी विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झालेले असतात आणि पालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या भवितव्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या पार्श्वभूमीवर संघटनांनी शिक्षण विभागाला निवेदन देत तातडीने अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच, लवकरात लवकर यादी प्रसिद्ध न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. शहरातील हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा प्रश्न असल्याने महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी पालक आणि विविध संघटनांकडून केली जात आहे.

‘नीट’ परीक्षेसाठी ड्रोनचा पहारा आणि कडक पोलीस बंदोबस्त; १७,७३४ विद्यार्थी देणार परीक्षा, कोचिंग क्लासेसचे पेपर्सही तपासणार

Web Title: Mira bhayandar illegal schools list not released parents confused mns student wing yuva sena demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 05:59 PM

Topics:  

  • education
  • maharashtra
  • mira bhayandar
  • Schools

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana: ‘योजनेत हा १० लाखांचा घोळ…’, सुप्रिया सुळे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेबद्दल केला धक्कादायक खुलासा
1

Ladki Bahin Yojana: ‘योजनेत हा १० लाखांचा घोळ…’, सुप्रिया सुळे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेबद्दल केला धक्कादायक खुलासा

IIT Admission News: IIT मध्ये उच्च शिक्षणाची मोठी संधी! JAM 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू; असं करा रजिस्ट्रेशन
2

IIT Admission News: IIT मध्ये उच्च शिक्षणाची मोठी संधी! JAM 2027 साठी अर्ज प्रक्रिया सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

CBSE Board Exam 2027: ‘सीबीएससई’चा शाळांना कठोर इशारा! विद्यार्थ्यांच्या माहितीतील एका चुकीमुळे…
3

CBSE Board Exam 2027: ‘सीबीएससई’चा शाळांना कठोर इशारा! विद्यार्थ्यांच्या माहितीतील एका चुकीमुळे…

Principal vs Principle मध्ये काय फरक आहे? जाणून घ्या लक्षात ठेवण्याची सोपी ट्रिक
4

Principal vs Principle मध्ये काय फरक आहे? जाणून घ्या लक्षात ठेवण्याची सोपी ट्रिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.