Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! राज्यातील SIR मोहिमेला दुसऱ्यांदा मुदतवाढ; तर अंतिम मतदार यादी ‘या’ तारखेला होणार जाहीर

Election Commission News: राज्यातील मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पुन्हा मुदतवाढ! BLO पडताळणी आता १७ ऑगस्टपर्यंत; अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबरला होणार प्रसिद्ध

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 04, 2026 | 09:12 PM
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! राज्यातील SIR मोहिमेला दुसऱ्यांदा मुदतवाढ (Photo Credit- AI)

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! राज्यातील SIR मोहिमेला दुसऱ्यांदा मुदतवाढ (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:
  • निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
  • राज्यातील SIR मोहिमेला दुसऱ्यांदा मुदतवाढ;
  • तर अंतिम मतदार यादी ‘या’ तारखेला होणार जाहीर
Maharashtra SIR: राज्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेचे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) मंगळवारी पुन्हा एकदा सुधारित केले आहे. या निर्णयानुसार बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) द्वारे केली जाणारी घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करण्याची मुदत ९ दिवसांनी वाढवून आता १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. परिणामी, राज्याची अंतिम मतदार यादी आता २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या (CEO) कार्यालयाने केलेल्या विनंतीनंतर निवडणूक आयोगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सुधारित वेळापत्रक जाहीर

नव्या वेळापत्रकानुसार, बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) १७ ऑगस्टपर्यंत मतदारांची घराघर जाऊन पडताळणी करणार आहेत. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांवर नोटिसा देणे, सुनावण्या घेणे आणि दावे-हरकतींचा निपटारा करण्याची प्रक्रिया २२ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाणार असून, २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाईल.

The Election Commission of India has released the revised schedule for Maharashtra’s Special Intensive Revision (SIR) of the electoral rolls. 🗳️ Booth Level Officers (BLOs) will continue door-to-door voter verification until August 17, 2026, while the final electoral roll will… pic.twitter.com/g4lO9QOjaA — Vasai Virar (@vasaivirarinfra) August 4, 2026

अधिकाऱ्यांना आणि राजकीय पक्षांना सूचना

निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सुधारित वेळापत्रकाची माहिती संबंधित सर्व अधिकाऱ्यांपर्यंत तातडीने पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच उपलब्ध सर्व माध्यमांतून या बदलांची व्यापक प्रसिद्धी करण्यास सांगितले असून, राज्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना लेखी स्वरूपात सुधारित वेळापत्रकाची माहिती देण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सक्षम कौशल्य जनगणना’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

दुसऱ्यांदा वाढवली मुदत

सध्या सुरू असलेल्या विशेष पुनरावलोकन मोहिमेदरम्यान आयोगाने दिलेली ही दुसरी मुदतवाढ आहे. यापूर्वी १७ जुलै रोजी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुसळधार पावसामुळे पडताळणीच्या कामात अडथळे निर्माण झाल्याचे सांगत अतिरिक्त वेळ मागितला होता. त्यावेळी घराघर पडताळणीची अंतिम मुदत २९ जुलैवरून ८ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. तसेच दावे आणि हरकती दाखल करण्याचा कालावधी १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर असा निश्चित करण्यात आला होता. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीखही पुढे ढकलून १९ ऑक्टोबर करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा वेळापत्रकात बदल करण्यात आला असून अंतिम यादी २७ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.

मुंबईत सुमारे १० हजार BLO कार्यरत

मुंबई शहर आणि उपनगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून सुमारे १० हजार बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) कार्यरत आहेत. प्रत्येक BLO वर साधारण ९०० ते १,२०० मतदारांची पडताळणी करण्याची जबाबदारी आहे. या प्रक्रियेदरम्यान BLO मतदारांना गणना फॉर्म वितरित करतात, मतदारांची माहिती पडताळतात, त्यावर स्वाक्षरी घेतात आणि संबंधित माहिती डिजिटल स्वरूपात अपलोड करतात. एखादा मतदार घरी उपलब्ध नसल्यास BLO किमान तीन वेळा भेट देतात. त्यानंतरही मतदार उपलब्ध न झाल्यास त्याची नोंद ASDD या श्रेणीत केली जाते.

Mumbai News: मेट्रो-६ च्या कारशेडचा तिढा अद्याप कायम! तोडगा न काढताच मेट्रो मार्गिका कार्यान्वित करण्याचा प्रयत्न

Web Title: Major decision by the election commission states sir campaign gets a second extension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 09:10 PM

Topics:  

  • Election Commission
  • maharashtra
  • SIR
  • Voter List
  • Voter List Online

संबंधित बातम्या

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
1

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
2

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
3

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा
4

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.