Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दप्तराच्या वाढत्या ओझ्याविरोधात मनसे आक्रमक! विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम

वाशिममध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या वाढत्या ओझ्याविरोधात मनसेने शिक्षण विभागाला निवेदन दिले. जड दप्तरामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 26, 2026 | 10:14 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

वाशिम जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरांच्या वाढत्या ओझ्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेत शिक्षण विभागाला निवेदन सादर केले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. लहान वयातच विद्यार्थ्यांना जड दप्तरांचा भार सहन करावा लागत असून, शिक्षणाचे साधन असलेले दप्तरच आता त्यांच्यासाठी त्रासदायक ठरत असल्याचे मनसेने स्पष्ट केले.

Railway News : प्रवाशांना लुटणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा दणका; 121 जणांवर दंडात्मक कारवाई

या पार्श्वभूमीवर मनसे नेते राजू उंबरकर, संपर्कप्रमुख बाबू वागस्कर आणि मनविसे प्रमुख संघटक चेतन पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सचिव अमोल गाभणे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. राज्यातील हजारो विद्यार्थी दप्तरांच्या ओझ्याखाली दबले जात असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. पुस्तके, वह्या, प्रोजेक्ट साहित्य यांचा अनावश्यक भार विद्यार्थ्यांवर लादला जात असून, याचा त्यांच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.

मनसेने या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वीच या मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शाळांसमोर निदर्शने, शिक्षण विभागाच्या कार्यालयांवर मोर्चे आणि आवश्यक असल्यास रस्त्यावर उतरून जनआंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता शिक्षण विभाग या मुद्द्यावर कितपत गांभीर्याने पावले उचलतो, याकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

मनसेने मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये इयत्तेनुसार दप्तराचे वजन निश्चित करणे, सर्व शाळांमध्ये लॉकरची सुविधा उपलब्ध करून देणे, डिजिटल शिक्षण आणि ई-बुक्सचा वापर वाढवणे, तसेच आठवड्याच्या नियोजनानुसार मर्यादित पुस्तके आणण्याचा नियम लागू करणे यांचा समावेश आहे. याशिवाय संयुक्त पुस्तके आणि वह्यांची प्रणाली राबवावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

‘2035 पर्यंत एसटी बसेस पूर्णत: होणार इलेक्ट्रिक’; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

या निवेदनावेळी मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष मनीष डांगे, शहराध्यक्ष रवी वानखेडे, फकीरा कर्डिले, शाहरुख मांजरे, चेतन इंगोले, संदीप वानखेडे, संतोष गवळी, गंगाराम खंदारे, जुम्मा बेनीवाले, गणेश खुणारे, संतोष होणारे आणि सागर न्याती आदी पदाधिकारी उपस्थित होते. एकूणच, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

Web Title: Mns takes aggressive stance against the rising burden of schoolbags

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

Buldhana News : गॅस दरवाढ, तुटवड्याविरोधात महिला आक्रमक! शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
1

Buldhana News : गॅस दरवाढ, तुटवड्याविरोधात महिला आक्रमक! शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Buldhana : LPG गॅस सिलेंडर साठी सकाळी चार वाजेपासूनच लागतात रांगा
2

Buldhana : LPG गॅस सिलेंडर साठी सकाळी चार वाजेपासूनच लागतात रांगा

Buldhana News: गारपीट आणि वादळ! चिखली तालुक्यात पिकांचे भारी नुकसान; जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
3

Buldhana News: गारपीट आणि वादळ! चिखली तालुक्यात पिकांचे भारी नुकसान; जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

Washim News : शाश्वत शेतीसाठी समन्वयाची नितांत गरज! जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन; जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा
4

Washim News : शाश्वत शेतीसाठी समन्वयाची नितांत गरज! जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन; जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.