बेरोजगारांसाठी एक नवी संधी चालून आली आहे. विशेषतः जे सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरेल. सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) म्हणजेच एमपीएससीने नोकरीसाठी (MPSC Job) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जवळपास २५३ वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया ( MPSC Recruitment 2022) राबवली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील विविध प्रशासकीय विभाग तसेच मुंबईतील विविध शासकीय कार्यालयातील लघुटंकलेखक, लघुलेखक पदांसाठी ही भरती होणार आहे.
लघुटंकलेखक(मराठी), गट क संवर्गातील एकूण 52 पदांच्या भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 43/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/n61IcadmYD
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) April 20, 2022
अशा पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत
उच्च श्रेणी लघुलेखक(इंग्रजी), गट ब, अराजपत्रित संवर्ग – एकूण ३० पदे
उच्च श्रेणी लघुलेखक(मराठी), गट ब, अराजपत्रित संवर्ग – एकूण ३२ पदे
लघुटंकलेखक(इंग्रजी), गट क संवर्ग – एकूण ३९ पदे
लघुटंकलेखक(मराठी), गट क संवर्ग – एकूण ५२ पदे
निम्न श्रेणी लघुलेखक(मराठी), गट ब, अराजपत्रित संवर्ग – एकूण ५५ पदे
निम्न श्रेणी लघुलेखक(इंग्रजी), गट ब, अराजपत्रित संवर्ग – एकूण ४५ पदे
नाशिक पालिकेत पदवीधरांना नोकरीची संधी, ४० हजारपर्यंत मिळेल पगार
‘या’ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात भरती, १ लाखांपर्यंत मिळेल पगार
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची तारीख – २२ एप्रिल २०२२ (दुपारी २ वाजल्यापासून)
अर्ज करण्याची अंतिम तारीख – १२ मे २०२२ (रात्री ११.५९ मिनिटापर्यंत)
दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक. लघुलेखनाची गती १०० शब्द प्रति मिनिट. टायपिंग गती ३० ते ४० शब्द प्रति मिनिट (पदनिहाय शैक्षणिक पात्रता अधिसूचनेत पाहावी)
लघुटंकलेखक(मराठी), गट क संवर्गातील एकूण 52 पदांच्या भरतीकरिता जाहिरात (क्रमांक 43/2022) प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/n61IcadmYD
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) April 20, 2022
अर्ज शुल्क
अराखीव (खुला) – ३९४ रुपये
मागसवर्गीय – २९४ रुपये
माजी सैनिक – ४४ रुपये
अर्ज कसा करावा?
– प्रथम उमेदवारांनी एमपीएससीची अधिकृत वेबसाइट https://mpsc.gov.in ला भेट द्यावी.
– आता अर्ज करण्यासाठी आयोगाची सूचना उघडा.
– त्यानंतर उमेदवार एमपीएससीची अधिसूचना डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचावा.
– त्यानंतर उमेदवाराने अर्ज ऑनलाइन लिंकवर क्लिक करावे.
– अर्जामध्ये सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील भरावा.
– अर्ज भरुन झाल्यानंतर उमेदवारांनी अर्ज सबमिट करण्यापूर्वी एकदा तपासावे.
– अर्ज सबमिट केल्यानंतर त्यांची एक प्रिंटआऊट काढून घ्यावी.