Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC Exam Postponed : मोठी बातमी! अखेर एमपीएससीची २१ डिसेंबरची परीक्षा पुढे ढकलली, नवीन तारीख काय? वाचा एका क्लिकवर

MPSC Exam Postponed News : आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. एमपीएससीची 21 डिसेंबरला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. दोन्ही परीक्षेचा सुधारित तारखा देखील जाहीर करण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 08, 2025 | 04:15 PM
अखेर एमपीएससीची २१ डिसेंबरची परीक्षा पुढे ढकलली, नवीन तारीख काय? वाचा एका क्लिकवर

अखेर एमपीएससीची २१ डिसेंबरची परीक्षा पुढे ढकलली, नवीन तारीख काय? वाचा एका क्लिकवर

Follow Us
Close
Follow Us:
  • एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली
  • नव्याने परीक्षेच्या तारखा जाहीर
  • 4 जानेवारी आणि 11 जानेवारी 2026 रोजी परीक्षा होणार
MPSC Exam Postponed News Marathi : राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४८ नगरपंचायत निवडणुकीच्या मतमतदानाचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सर्वच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर 21 डिसेंबरला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आले आहे. त्यानुसार नव्याने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत आणि दैनंदिन परीक्षा ४ जानेवारी आणि ११ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-अ सेवा एकत्रित पूर्वपरीक्षा २०२५ (परीक्षा) अनुक्रमे ४ जानेवारी आणि ११ जानेवारी २०२६ रोजी होणार आहेत.यासंदर्भातील आयोगाने माहिती दिली की, संबंधित शुद्धीपत्रक आयोगाच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आले आहे. त्यामुळे, परीक्षार्थी, उमेदवारांनी याची दखल घ्यायला हवी.

शाळांमध्ये होणार शुकशुकाट! ५० हजार शिक्षक १० डिसेंबरला नागपूरला अधिवेशनात देणार धडक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ ची परीक्षा २१ डिसेंबर २०२५ रोजी दररोज सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत घेण्यात येणार होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या २ डिसेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक २०२४ कार्यक्रमांतर्गत, सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना २१ डिसेंबर रोजी मतदान घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आयोगाने घेतलेली परीक्षा आणि मतदान त्याच दिवशी म्हणजेच २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार असल्याने, काही बाबी लक्षात घेता राज्यातील सर्व जिल्हा दंडाधिकारी कार्यालयांकडून त्याबाबतची माहिती मागवण्यात आली. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेली माहिती आणि निकालाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वर नमूद केल्याप्रमाणे जिल्हाधिकार यांचेकडून मागविलेल्या माहितीच्या अनुषंगाने, काही जिल्हा केंद्रावरी परीक्षा उपक्रेंद्र आणि मतमोजणीचे ठिकाण यामधील कमी अंतर, लाऊडस्पीकरचा आवाज, वाहतूक कोंडी, परीक्षेदरम्यान उत्तीर्ण झालेल्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, तसेच परीक्षा आयोजित करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कमतरता इत्यादी बाबी लक्षात घेऊन परीक्षा घेण्यात अडचणी येऊ शकतात असे कळविण्यात आले. सदर वस्तुस्थिती लक्षात घेऊन आयोगाने नियोजित तारखेला न घेता परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे आणि परिपत्रकाद्वारे त्याची घोषणा केली आहे.

४ आणि ११ जानेवारी परीक्षा होणार

आयोगाच्या परिपत्रकानुसार, MPSC गट ‘ब’ संयुक्त सेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख ४ जानेवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, महाराष्ट्र गट ‘अ’ संयुक्त सेवा पूर्व परीक्षा ११ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.

पुण्यातील इंदिरा विद्यापीठ आणि MIT आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाशी केली फिलिप्सची भागीदारी

Web Title: Mpsc postpones group b joint exam on 21 december due to vote counting news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 04:03 PM

Topics:  

  • Career News
  • Exam
  • MPSC

संबंधित बातम्या

मुंबईत पहिला बालसाहित्य महोत्सव, ब्रेनोलॉजी आणि ब्रुकफील्ड प्रॉपर्टीजची भागीदारी; कौटुंबिक शिक्षणाचा प्रेरणादायक उत्सव
1

मुंबईत पहिला बालसाहित्य महोत्सव, ब्रेनोलॉजी आणि ब्रुकफील्ड प्रॉपर्टीजची भागीदारी; कौटुंबिक शिक्षणाचा प्रेरणादायक उत्सव

Career Options for Girls After 12th: बारावीनंतर मुलींसाठी उत्तम करिअरचे पर्याय!
2

Career Options for Girls After 12th: बारावीनंतर मुलींसाठी उत्तम करिअरचे पर्याय!

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही सरकारचे लक्ष! नेमण्यात आली समिती, करणार तणाव व्यवस्थापन
3

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरही सरकारचे लक्ष! नेमण्यात आली समिती, करणार तणाव व्यवस्थापन

कनिष्ठ भूवैज्ञानिक भरतीचा निकाल रखडला; उमेदवारांत तीव्र नाराजी
4

कनिष्ठ भूवैज्ञानिक भरतीचा निकाल रखडला; उमेदवारांत तीव्र नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.