पुण्यातील विद्यापिठांचा करार
या उपक्रमामुळे तांत्रिक शिक्षणातील महत्त्वाची पोकळी भरून निघणार आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्पेशलायझेशनची मागणी सातत्याने वाढत असतानाही सध्या फारच कमी संस्थांकडे हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे, ज्यामुळे कुशल प्रोजेक्ट मॅनेजमेंट इंटर्न्स आणि करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यातील व्यावसायिकांची गरज पूर्ण होत नाही.
शिक्षणातून उद्योगात जाणाऱ्यांना फायदा
या भागीदारीद्वारे फिलिप्सचा उद्देश शिक्षणातून उद्योगात जाणारा दुवा अधिक मजबूत करणे आहे. त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव आधारित, नेतृत्वकेंद्रित आणि भविष्यातील गरजांशी सुसंगत अशा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कौशल्यांचा समावेश करण्यात येत आहे, जे उद्योगात प्रचलित सर्वोत्तम पद्धतींशी जोडलेले आहेत.हा उपक्रम प्रतिभाविकासातील सखोलता, अनुप्रयुक्त शिक्षण, जबाबदारीची जाणीव आणि वर्तनातील उत्कृष्टता वाढविण्याच्या फिलिप्सच्या वचनबद्धतेला अधिक बळकटी देतो. हे सर्व गुण यशस्वी प्रोजेक्ट मॅनेजर्ससाठी अत्यावश्यक मानले जातात.
दोन विद्यापिठांमध्ये होणार सुरूवात
हा कार्यक्रम सुरुवातीला या दोन भागीदार विद्यापीठांमध्ये राबवला जाणार असून लवकरच इतर संस्थांपर्यंतही त्याचा विस्तार करण्याची योजना आहे. या स्पेशलायझेशनमध्ये 50 तासांचे वर्गांमधील आणि ऑनलाइन प्रशिक्षण समाविष्ट आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये प्रशिक्षित विद्यापीठीय प्राध्यापक आणि फिलिप्सचे तज्ञ यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण दिले जाईल. फिलिप्स विद्यापीठांना अभ्यासक्रमाचे साहित्यही उपलब्ध करून देईल, ज्यामुळे प्रशिक्षित प्राध्यापकांना त्यांच्या विद्यमान शैक्षणिक रचनेत हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवणे सोपे जाईल. उद्योगातील अनुभव वाढवण्यासाठी फिलिप्सचे प्रोजेक्ट मॅनेजर्स प्रत्येक तिमाहीत दोन्ही कॅम्पसमध्ये गेस्ट लेक्चर घेणार आहेत.
कसे असणार धोरण
हा उपक्रम ‘स्किल इंडिया मिशन’शी पूर्णपणे सुसंगत आहे आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी 2020) ला देखील बळकटी देतो. दोन्ही धोरणांमध्ये उद्योग–शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य आणि अनुभवाधारित, कौशल्यकेंद्रित शिक्षणाचा उच्च शिक्षणात समावेश करण्यावर भर दिला आहे. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन विद्यार्थ्यांना उद्योग-तयार प्रोजेक्ट मॅनेजमेंट कौशल्ये मिळाल्याने त्यांची रोजगारयोग्यता वाढेल आणि भविष्यात बदलत्या कामकाजाच्या गरजांसाठी ते अधिक तयार होतील.
या स्पेशलायझेशनमुळे विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप आणि नोकरीच्या संधींमध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. या संधी फक्त फिलिप्सपुरती मर्यादित राहणार नाही, तर विविध संस्था आणि उद्योगांमध्ये मिळू शकतील. प्रोजेक्ट मॅनेजमेंट ही विविध विभागांमध्ये आणि क्षेत्रांमध्ये लागू होणारी महत्त्वाची कुशलता असल्यामुळे विद्यार्थी अभियांत्रिकी, उत्पादन विकास, ऑपरेशन्स, तंत्रज्ञान आणि इतर प्रोजेक्ट-केंद्रित क्षेत्रांमध्ये विस्तृत करिअर पर्यायांचा लाभ घेऊ शकतील.
विद्यापिठांसह भागीदारी
फिलिप्सचे हेल्थकेअर इनोव्हेशन सेंटरचे प्रमुख रोहित साठे म्हणाले, “फिलिप्समध्ये आम्ही पुढील पिढीतील व्यावसायिकांना सक्षम बनवण्यावर विश्वास ठेवतो, जेणेकरून ते भारतातील झपाट्याने बदलणाऱ्या इनोव्हेशन क्षेत्रात गुंतागुंतीचे आणि प्रभावी प्रोजेक्ट्स सक्षमपणे हाताळू शकतील. इंदिरा विद्यापीठ आणि एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठासोबतची आमची भागीदारी विद्यार्थ्यांपर्यंत थेट उद्योगमानक प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रशिक्षण पोहोचवते. यामुळे त्यांचा आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि प्रत्यक्ष जगातील आव्हानांसाठी तयारी त्यांच्या शैक्षणिक प्रवासाच्या सुरुवातीपासूनच मजबूत होते.”
Bigg Boss 19 विजेता Gaurav Khanna चे शिक्षण आहे अफाट, कानपूर-मुंबईत घेतलंय शिक्षण
तज्ज्ञांचे म्हणणे
भागीदारीबद्दल बोलताना इंदिरा विद्यापीठ, पुणेच्या कुलगुरू डॉ. अनघा जोशी म्हणाल्या, “फिलिप्ससोबत या परिवर्तनात्मक उपक्रमासाठी आम्ही भागीदारी करत आहोत याचा आम्हाला आनंद आहे. उद्योगाशी सुसंगत प्रोजेक्ट मॅनेजमेंट कौशल्ये आमच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केल्याने विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष जगातील आव्हानांसाठीची तयारी मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी नवीन संधी निर्माण होतील.”
MIT आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणेचे एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट डॉ. मघेश कराड म्हणाले, “जागतिक उत्कृष्टतेकडे वाटचाल करताना आम्हाला अभिमान वाटतो. ही भागीदारी उद्योग–शैक्षणिक सहकार्य अधिक मजबूत करण्याकडे एक महत्त्वाचे पाऊल आहे. संरचित प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्पेशलायझेशनच्या सुरूवातीमुळे विद्यार्थ्यांना अत्यंत मागणी असलेली कौशल्ये मिळतील आणि ते गतिशील व गुंतागुंतीच्या प्रोजेक्ट वातावरणात उत्कृष्ट कामगिरी करण्यास तयार होतील.”






