फोटो सौजन्य - Social Media
शासनाकडून विविध विभागांतील रिक्त पदांच्या मागणीनुसार आयोग दरवर्षी अनेक स्पर्धा परीक्षा आयोजन करतो. त्या अनुषंगाने सन २०२६ मध्ये होणाऱ्या प्रमुख परीक्षांचे प्राथमिक दिनांक निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये राज्यसेवा, गट-ब संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा, अभियांत्रिकी सेवा, पोलिस उपनिरीक्षक परीक्षा, तसेच विविध विभागातील स्वतंत्र भरती चाचण्यांचा समावेश आहे.
वेबसाइटवर सर्व तपशील उपलब्ध
सन २०२६ मधील परीक्षांसंबंधित वेळापत्रक, अभ्यासक्रम, परीक्षायोजना, निवड प्रक्रिया आणि इतर अद्ययावत माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळांवर — https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in — उपलब्ध करण्यात आली आहे. परीक्षांसंबंधी आवश्यक माहिती वेळोवेळी अद्यतनित केली जाणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले.
पदांची संख्या जाहिरातीत जाहीर
प्रत्येक परीक्षेमधून भरावयाच्या पदांची अचूक संख्या संबंधित परीक्षेची जाहिरात/अधिसूचना प्रकाशित करताना जाहीर केली जाईल. सध्या जाहीर केलेले वेळापत्रक हे प्राथमिक असून, काही परीक्षांचे दिनांक निश्चित नसल्यामुळे त्या परीक्षांसंबंधित सविस्तर विवरण नंतरच्या अधिसूचनेत जाहीर केले जाईल.
उमेदवारांनी स्वतः घ्यावा निर्णय
एकाच दिवशी एमपीएससीची परीक्षा आणि इतर संस्थेची परीक्षा येत असल्यास कोणती परीक्षा देायची हा निर्णय उमेदवारांनी स्वतः घ्यावा, असे आयोगाने स्पष्ट नमूद केले आहे. अनेक उमेदवार विविध स्पर्धा परीक्षांसाठी बसत असल्याने या स्पष्ट सूचनेला महत्त्व आहे.
स्पर्धा परीक्षांना वेग
राज्यातील तरुणांसाठी एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा ही सर्वात मोठी संधी मानली जाते. विशेषतः गट-अ आणि गट-ब अधिकारी म्हणून सेवेत दाखल होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. २०२६ मधील अंदाजित वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे अभ्यासाची दिशा, नियोजन आणि तयारी अधिक नेमकी करण्यास विद्यार्थ्यांना मदत होणार आहे.
सध्या आयोगाच्या संकेतस्थळांवर उपलब्ध असलेल्या वेळापत्रकात पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि शारीरिक चाचण्यांचे तात्पुरते दिनांक दिले आहेत. वेळापत्रकात बदल करण्याचा अधिकार आयोगाकडे राखीव असून, आवश्यक तेव्हा सुधारित वेळापत्रकही प्रसिद्ध केले जाईल.
उमेदवारांसाठी सूचना






