Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

HSC Result : मुंबई विभागाचा निकाल घसरला! यंदा मुंबई विभाग राज्यात पाचव्या क्रमांकावर

मुंबई विभागाचा बारावीचा निकाल यंदा ९०.०८ टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत २.८५ टक्क्यांची घसरण झाली आहे. तरीही राज्याच्या क्रमवारीत मुंबईने सातव्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 02, 2026 | 08:37 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

नीता परब, मुंबई : बारावी परीक्षेच्या निकालात मुंबई विभागाचा यंदा एकूण निकाल ९०.०८ टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत २.८५ टक्क्यांची घसरण झाली आहे. तरीही राज्याच्या क्रमवारीत मुंबई विभागाने सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. एकूण निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली असून त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.२५ तर मुलांची ८७.९९ टक्के नोंदवली गेली आहे.

UPSC Exam Success Tips : अधिकारी बनायचंय? मग UPSC ची तयारी करताना चुकूनही करू नका ‘या’ ५ चुका

यंदा मुंबई विभागातून ३ लाख २४ हजार ७३९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ३ लाख २३ हजार ५०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २ लाख ९१ हजार ४१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या कामगिरीत मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा निकाल ९५.६४ टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत केवळ ०.६९ टक्क्यांची किरकोळ घट झाली आहे. या शाखेत मुलींची उत्तीर्णता ९६.४० टक्के असून मुलांची ९४.९७ टक्के आहे. वाणिज्य शाखेत मात्र मोठी घसरण दिसून आली असून निकाल ५.६१ टक्क्यांनी कमी झाला आहे. १ लाख ५६ हजार ९०० विद्यार्थ्यांपैकी १ लाख ३६ हजार ४७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

IIT Delhi Recruitment 2026: आयआयटी दिल्लीत नोकरीची संधी! २.५ लाखांपेक्षा जास्त पगार देणारी ‘ही’ पदे माहितीयेत का?

दुसरीकडे कला शाखेच्या निकालात किंचित सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षी ८४.६३ टक्के असलेला निकाल यंदा ०.५६ टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे कला शाखेतील विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक मानली जात आहे. गेल्या चार वर्षांच्या तुलनेत मुंबई विभागाचा निकाल चढ-उतार अनुभवत आहे. २०२३ मध्ये ८८.१३ टक्के, २०२४ मध्ये ९१.९५ टक्के, २०२५ मध्ये ९२.९३ टक्के आणि यंदा ९०.०८ टक्के असा प्रवास राहिला आहे. निकालाच्या श्रेणीमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून ३९,०८९ विद्यार्थ्यांनी प्राविण्यसह प्रथम श्रेणी मिळवली आहे, तर ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे ८१,९१६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ४५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे १,२६,५६० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर ३५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे ४३,९१० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.

Web Title: Mumbai divisions results decline mumbai division ranks fifth in the state this year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 08:37 PM

Topics:  

  • Career News
  • HSC

संबंधित बातम्या

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
1

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!
2

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
3

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा
4

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.