फोटो सौजन्य - सोशल मीडिया
या पदासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २७ एप्रिलपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारिख १२ मे २०२६ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे या पदासाठी जे इच्छुक आणि पात्र उमेद्वार आहेत, त्यांनी अर्ज केल्यास त्यांना गुणवत्तेनुसार आयआयटीमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेद्वारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून संबंधित पदानुसार शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे. उमेद्वार ऑटोमोबाईल इंजिनीयरिंगमध्ये बी.टेक (B.Tech) म्हणजे ग्रॅजुएशन डिग्री किंवा पोस्ट ग्रॅजुएशन डिग्री प्रथम श्रेणीत असणे गरजेचे आहे यासोबतच उमेद्वाराकडे निकषानुसार पात्रता कौशल्य आणि या क्षेत्रातील ठरावीक वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.
पात्र उमेद्वारांची निवड ही शॉर्टलिस्टिंग, मुलाखत (Interview) आणि कागदपत्र पडताळणीद्वारे केली जाईल. निवड झालेल्या उमेद्वारांना पदानुसार दरमहा ४७,७९० ते २,५३,६४० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.






