BMC शाळेच्या शिक्षकांबाबत बैठक
मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील दोनशे शाळांमधील १५०० शिक्षकांच्या पीएफसह अन्य सर्व प्रश्नांना प्रशासकीय मंजूरी मिळाली असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी आज भाजपाचे प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांच्या समवेत झालेल्या चर्चेत स्पष्ट केले
याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या करी रोड येथील शिक्षण अधिकारी कार्यालयात आज एक बैठक झाली या बैठकीला भाजपाचे प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे, डॉ जितेंद्र लिंबकर अशोक गर्जे रोहित कुलकर्णी यशवंत पवार चंद्रकांत घोडेराव विक्रांत गायकवाड धर्मेंद्र तिवारी अंबादास माने यासह अन्य शिक्षक उपस्थित होते
काय होती परिस्थिती, १८ वर्षांपासून प्रलंबित
मुंबई मनपाच्या संपूर्ण मुंबईमध्ये 249 माध्यमिक शाळा असून त्यापैकी ५१ शाळा या अनुदानित व 200 शाळा या विनाअनुदानित आहेत. अनुदानित शाळांसाठी शासन अनुदान देते व विनाअनुदानित शाळा या मनपा स्वखर्चाने चालवते. सदर शाळांमध्ये जवळपास 1500 शिक्षक कार्यरत असून सन 2008 पासून सदर सर्व शिक्षक आपले काम जबाबदारीने पार पाडत आहेत.
गेल्या १८ वर्षांपासून आर्थिक कल्याणकारी लाभांपासून वंचित आहेत. भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युईटी, मृत्यू उपदान, कुटुंब पेन्शन योजना यांसारख्या मूलभूत योजनांपासून वंचित असल्याचे समोर आले आहे. सदर शिक्षकांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे परंतु कोणताही ठोस निर्णय अद्याप पर्यंत झालेला नाही.
काय होती समस्या
DC-। योजना सन २००७ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे DC-1 ही पेन्शन योजना लागू आहे या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांचा पगार मधून 10% रक्कम कपात करणे आणि तितकीच रक्कम सरकारकडून त्यामध्ये Add करून सदर रक्कम DCPS च्या खात्यांमध्ये टाकली जाते, परंतु सदर कर्मचारी सेवेत कायम होऊन 14 वर्षे झाली परंतु अद्याप मुंबई मनपा शिक्षण विभागाकडून कर्मचाऱ्यांचे DCPS चे खातेच उघडले गेले नाही, या शिक्षकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा देखील केलेला आहे पण फक्त तुमचे काम सुरू आहे एवढेच आश्वासन शिक्षकांना मिळते. एखादे काम होण्यासाठी 14 वर्षे लागतात याची खूप खंत वाटत असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले
मुंबई मनपातील शिक्षकांच्या प्रश्नाबाबत गुरूवारी बैठक, BJP चे अनिल बोरनारे मांडणार शिक्षकांचे प्रश्न
१४ वर्षापासून भिजत घोंगडे
मागील 14 वर्षापासून कर्मचाऱ्यांची कोणतीही रक्कम कपात केली नाही त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याचे जवळपास 20 लक्ष रुपयापर्यंतची आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच सदर कालावधीमध्ये काही कर्मचारी मयत देखील झालेले आहेत मनपा च्या या वेळ काढू पणामुळे मयत झालेल्या कुटुंबाची वाताहत झालेली आहे.
मुंबई मनपाच्या माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक मन लावून मेहनत करतात एस. एस. सी परीक्षा मार्च 2025 चा निकाल उत्तम लागलेला आहे, प्रशासन कडून कौतुकाची थाप देखील मिळते, परंतु फक्त धोरणात्मक बाब म्हणून शिक्षकांचा DCI चा प्रश्न 14 वर्षे तसाच आहे, परंतु अद्याप पर्यंत निर्णय होत नाही हे दुर्दैव आहे
सरकार शिक्षकांना वेळेवर पैसै देणार आहे का ? भाजपा शिक्षक आघाडीचा सवाल