कल्याण: राज्यातील काही जिल्ह्यांत मार्च महिन्याचे तर बहुतांश जिल्ह्यात एप्रिल महिन्याचे वेतन न झाल्याने शिक्षक(Teacher`s salary) हवालदिल झाले आहेत. शासन शिक्षकांना वेळेवर वेतन देणार आहे की नाही ? असा सवाल भाजपा(BJP) शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी शासनाला विचारला आहे.
कोरोना योद्धे म्हणून राज्यातील हजारो शिक्षक काम करीत असून त्यांच्याच वेतनाचा निधी अद्याप मंजूर होत नसल्याने राज्यभरातील शिक्षक-शिक्षकेतरांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
[read_also content=”तौक्ते चक्रीवादळामुळे घडली दुर्घटना – डोंबिवलीमध्ये ओव्हरहेड वायरवर झाड कोसळल्याने लागली आग https://www.navarashtra.com/latest-news/tree-fall-on-overhead-wire-at-dombivali-railway-station-big-fire-incident-nrsr-130281.html”]
मुंबईतील उत्तर, पश्चिम दक्षिण, कोकणातील रत्नागिरी, सिधुदुर्ग, रायगड व पालघर, नागपूर विभागातील नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, मराठवाड्यातील बीड, नांदेड, औरंगाबाद, उस्मानाबाद अमरावती विभागातील बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, उत्तर महाराष्ट्रातील जळगव, धुळे, नगर, नंदुरबार व नाशिक तसेच पुणे विभागातील जिल्ह्यांमध्ये शिक्षकांना वेतन देण्यासाठी निधीच शिल्लक नसल्याचा आरोपही भाजपा शिक्षक आघाडीने केला आहे. यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचे वेतनही शिक्षकांना न मिळाल्याने अनेक आर्थिक संकटांना शिक्षकांना सामोरे जावे लागत आहे.
याबाबत भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी मुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्तांना पत्र दिले असून त्यात तातडीने वर्षभराचा निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे.
राज्यातील अनेक शिक्षक कोरोना प्रतिबंधक काम करीत असून त्यात अनेक शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून अनेक शिक्षक पॉझिटिव्ह असल्याने कोरोनामुळे वरील औषधोपचार, बॅंकांचे थकलेले हफ्ते, त्यावर आकारलेला दंड यामुळे शिक्षक आधीच त्रस्त आहे त्यात प्रत्येक महिन्याला जर असाच उशीर झाला तर शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर बँकांची दंड आकारणी होईल. त्यामुळे सरकारने एप्रिल ते पुढील वर्षाच्या मार्च महिन्यांपर्यंत शिक्षक-शिक्षकेतरांच्या वेतनासाठी निधी उपलब्ध करून घ्यावा जेणेकरून वेतनाला दर महिन्याला उशीर न होता शिक्षकांचे वेतन वेळेवर होतील असे अनिल बोरनारे यांनी सांगितले.