Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik School : मनपा शाळेत ‘वॉटर बेल’, उन्हाच्या तडाख्यापासून विद्यार्थ्यांचे होणार संरक्षण

नाशिक मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना उष्माघातापासून संरक्षण देण्यासाठी ‘वॉटर बेल’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. उष्माघातासारख्या आजारांपासून त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 30, 2026 | 12:12 PM
मनपा शाळेत 'वॉटर बेल', उन्हाच्या तडाख्यापासून विद्यार्थ्यांचे होणार संरक्षण

मनपा शाळेत 'वॉटर बेल', उन्हाच्या तडाख्यापासून विद्यार्थ्यांचे होणार संरक्षण

Follow Us
Follow Us:
  • मनपा शाळेत ‘वॉटर बेल’
  • उन्हाच्या तडाख्यापासून विद्यार्थ्यांचे होणार संरक्षण
  • काय आहे ‘वॉटर बेल’ उपक्रम ?
नाशिक : वाढत्या उन्हाळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता, नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व मनपा प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये आता ‘वॉटर बेल’ (पाणी पिण्याची घंटा) उपक्रम राबवण्यात येणार आहे. याद्वारे विद्याथ्यांना नियमित अंतराने पाणी पिण्याची सवय लावून उष्माघातासारख्या आजारांपासून त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.

केवळ विद्यार्थ्यांच्याच नव्हे, तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीही विभागाने पुढाकार घेतला आहे. प्रत्येकाने स्वतःची पाण्याची बाटली शाळेत सोबत बाळगावी आणि वेळोवेळी पाणी प्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, विद्यार्थ्यांना पुरेसे पाणी पिण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे निर्देशही शिक्षकांना देण्यात आले आहेत.

Ashok Kharat : ‘तो सिद्धपुरुष आणि माझा गुरू’, ‘त्या’ आत्मचरित्रामध्ये अशोक खरातचा उल्लेख; पुस्तकात चमत्कारांचे दाखले

काळजी घेण्याचे आवाहन

गेल्या काही दवसांपासून वातावरणात कमालीचा बदल होत आहे, कधी गारवा, कधी ढगाळ वातावरण तर कधी एकदम कडक उन्हाचा तडाखा यामुळे वद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती असल्याने पालकांनीही काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशसानाने केले आहे.

काय आहे ‘वॉटर बेल’ उपक्रम ?

सध्या कडाक्याच्या उन्हामुळे निर्जलीकरण (डिहायड्रेशन), थकवा, चक्कर येणे यांसारख्या तक्रारी विद्यार्थ्यांमध्ये वाढण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी शाळांमध्ये दर दोन तासिकांनंतर एक विशेष घंटा वाजवली जाईल. ही घंटा वाजताच सर्व विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून दिली जाईल. या निर्णयाबाबत शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी अधिकृत आदेश जारी केले आहेत. या उपक्रमाची शाळांमध्ये काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

‘वॉटर बेल’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर पाणी पिण्याची सवय लागेल आणि उष्माघातासारख्या त्रासांपासून त्यांचे संरक्षण होईल, सर्व शाळांनी या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. उन्हाळ्याच्या पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे,अशी प्रतिक्रिया मनपा शिक्षण विभाग प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी दिली.

उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेने शाळांमध्ये ‘वॉटर बेल’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत ठराविक वेळाने घंटा वाजवली जाते आणि त्या वेळी सर्व विद्यार्थ्यांना पाणी पिण्यास प्रोत्साहित केले जाते.

अनेकदा खेळ, अभ्यास किंवा इतर उपक्रमांमध्ये गुंतल्यामुळे लहान मुले पाणी पिणे विसरतात. त्यामुळे डिहायड्रेशन, थकवा आणि उष्माघाताचा धोका वाढतो. ‘वॉटर बेल’मुळे विद्यार्थ्यांना वेळोवेळी पाणी पिण्याची सवय लागणार असून त्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. शाळांमध्ये शिक्षकांनाही या उपक्रमाची जबाबदारी देण्यात आली आहे. घंटा वाजल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने पाणी पिले आहे का, याची खात्री केली जाते. काही शाळांमध्ये पाण्याची स्वच्छता आणि उपलब्धता याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे.

हा उपक्रम केवळ उष्णतेपासून संरक्षण देण्यासाठीच नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या आरोग्याच्या सवयी विकसित करण्यासाठीही महत्त्वाचा ठरत आहे. पालकांकडूनही या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, इतर शहरांनीही अशीच पद्धत अवलंबावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Malvan News: मालवणच्या विकासासाठी शासन दरबारी पाठपुरावा; आणखी ३० कोटींचा निधी आणणार – आ. निलेश राणे

Web Title: Nashik municipal schools introduce water bell to protect students from heat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Nashik
  • Students

संबंधित बातम्या

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
1

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला
2

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात
3

Yuva Shakti Samriddhi: कमाई सुरू होण्यापूर्वीच गुंतवणुकीचे ज्ञान! विद्यार्थ्यांसाठी ‘युवा शक्ती समृद्धी’ची सुरुवात

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!
4

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.