Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCERT Book Syllabus Change: ८ वीच्या नवीन पुस्तकात मोठा बदल! ‘या’ घटकांना अभ्यासक्रमातून आले वगळण्यात

NCERT Book Syllabus Change: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून लागू होणाऱ्या NCERT च्या सुधारित पुस्तकात इतिहासाची मांडणी कशी बदलली आहे? फाळणीच्या निर्णयाबाबत काँग्रेस नेत्यांची 'हतबलता' दर्शवणारा भाग का काढून टाकण्यात आला?जाणून घ्या वाद आणि चर्चेत असलेल्या या नवीन बदलांविषयी...

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 08, 2026 | 02:59 PM
ncert

ncert

Follow Us
Follow Us:

NCERT Book Syllabus Change: नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (NCERT) इयत्ता ८ वीचे सामाजिक शास्त्राचे सुधारित पुस्तक प्रसिद्ध केले आहे. या नवीन पुस्तकात भारताचे स्वातंत्र्य, फाळणी आणि स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये बदल करण्यात आले आहेत. विशेषतः काँग्रेसची भूमिका, विनायक दामोदर सावरकर यांचा ‘स्वराज’चा विचार आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित माहिती नवीन पद्धतीने मांडण्यात आली आहे. या बदलांमुळे शिक्षण आणि इतिहासाच्या क्षेत्रात पुन्हा एकदा नवीन चर्चा सुरू झाली आहे.

फाळणीबाबत काँग्रेसच्या भूमिकेची नवीन मांडणी

पूर्वीच्या आवृत्तीत (Edition) असे लिहिले होते की, महात्मा गांधी आणि बहुतांश काँग्रेस नेते फाळणीच्या विरोधात होते, परंतु परिस्थितीमुळे त्यांनी ती स्वीकारली. तर, सुधारित पुस्तकात ही बाब अधिक संतुलित पद्धतीने मांडण्यात आली आहे. इंग्रजांनी प्रदीर्घ काळ हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये मतभेद वाढू दिले, ज्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली, असे यात नमूद केले आहे. तसेच, फाळणी ही संपूर्ण देशाची इच्छा नव्हती, तर काही घटकांमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांचा तो परिणाम होता, असेही म्हटले आहे. पूर्वीच्या पुस्तकात काँग्रेस नेत्यांच्या हतबलतेचा जो उल्लेख होता, तो आता काढून टाकण्यात आला आहे.

सुधारित प्रकरणामध्ये स्वातंत्र्याच्या मागणीचा इतिहास अधिक सविस्तरपणे मांडण्यात आला आहे. आता यामध्ये १९२५ मध्ये वि. दा. सावरकर यांनीही स्वराज्याची मागणी केली होती, हा मुद्दा जोडण्यात आला आहे. याशिवाय योगी श्री अरविंद यांच्या सुरुवातीच्या विचारांचाही उल्लेख करण्यात आला आहे. पूर्वी हा भाग प्रामुख्याने काँग्रेस नेते, मौलाना हसरत मोहानी, जवाहरलाल नेहरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापुरता मर्यादित होता.

CA Exam Schedule: सीए परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; ‘या’ तारखेपूर्वी करा अप्लाय

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भांत बदल

नवीन पुस्तकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जर्मनी प्रवासाशी संबंधित भागामध्येही बदल करण्यात आला आहे. पूर्वीच्या पुस्तकात ॲडॉल्फ हिटलर आणि नाझी विचारसरणीचा स्पष्ट उल्लेख होता. आता त्याऐवजी केवळ इतकेच लिहिले आहे की, नेताजींनी ब्रिटिश शासनाचा विरोध करणाऱ्या देशांकडून सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न केला होता. हिटलर आणि नाझी विचारसरणीचा थेट उल्लेख आता वगळण्यात आला आहे.

‘भारत छोडो’ आंदोलन प्रकरणातही बदल

१९४२ च्या ‘भारत छोडो’ (Leave India) आंदोलनाशी संबंधित भागातही काही बदल करण्यात आले आहेत. पूर्वी जिथे महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांसारख्या नेत्यांची नावे घेऊन त्यांच्या अटकेचा उल्लेख करण्यात आला होता, तिथे आता केवळ ‘काँग्रेसचे जवळपास सर्वच नेतृत्व अटक करण्यात आले होते’ असे लिहिले आहे. यासोबतच, समाजवादी नेते राममनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेला अधिक ठळकपणे समाविष्ट करण्यात आले आहे.

PGI Report: शिक्षण मंत्रालयाचा धक्कादायक खुलासा! ‘एकल-शिक्षक’ शाळांच्या यादीत ‘हे’ राज्य पहिल्या क्रमांकावर

नवीन पुस्तक कधीपासून लागू होणार?

NCERT चे हे सुधारित पुस्तक शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून देशभरातील शाळांमध्ये शिकवले जाईल. यापूर्वी, याच पुस्तकातील न्यायव्यवस्थेशी संबंधित एका प्रकरणावरून वाद झाला होता, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तो भाग पुन्हा लिहिला गेला आणि नंतर सुधारित आवृत्ती जारी करण्यात आली.

NCERT ची भूमिका काय?

NCERT च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्था वेळोवेळी शिक्षक, तज्ज्ञ आणि इतर घटकांकडून मिळणाऱ्या सूचना व प्रतिक्रियांचे पुनरावलोकन करते. त्याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून पुस्तकांमध्ये आवश्यकतेनुसार बदल केले जातात, जेणेकरून अभ्यासक्रम अधिक संतुलित आणि अपडेटेड करता येईल. मात्र, इतिहासाच्या प्रकरणात करण्यात आलेल्या या नवीन बदलांवर NCERT आणि शिक्षण मंत्रालयाकडून स्वतंत्रपणे कोणतीही अधिकृत टिप्पणी करण्यात आलेली नाही.

Web Title: Ncert book syllabus change 8 social science book savarkar netaji partition history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • education
  • History
  • Mahatma Gandhi

संबंधित बातम्या

Vidya Saathi App : विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! ‘विद्या साथी ॲप’ लाँच; २४ तास लाईव्ह टीचर आणि AI टूल्सची मिळणार मदत!
1

Vidya Saathi App : विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! ‘विद्या साथी ॲप’ लाँच; २४ तास लाईव्ह टीचर आणि AI टूल्सची मिळणार मदत!

CBSE School: दयानंद शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा ‘माध्यम’तर्फे सत्कार; लाहोटी-बियाणी यांची सहाव्यांदा बिनविरोध निवड
2

CBSE School: दयानंद शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा ‘माध्यम’तर्फे सत्कार; लाहोटी-बियाणी यांची सहाव्यांदा बिनविरोध निवड

PhD In Japan: जपानमध्ये पीएचडी करायचे स्वप्न पाहताय? मग लगेच जाणून घ्या तेथील खर्च, फी आणि स्कॉलरशिपबद्दल..
3

PhD In Japan: जपानमध्ये पीएचडी करायचे स्वप्न पाहताय? मग लगेच जाणून घ्या तेथील खर्च, फी आणि स्कॉलरशिपबद्दल..

कॉमर्सचा विद्यार्थी कसा बनला ‘AI Kid of India’? जाणून घ्या केरळच्या तरुणाची यशोगाथा..
4

कॉमर्सचा विद्यार्थी कसा बनला ‘AI Kid of India’? जाणून घ्या केरळच्या तरुणाची यशोगाथा..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.