Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCERT Class 9 Book: ९ वीच्या नव्या पुस्तकातील ‘मनुस्मृती’च्या संदर्भावरून का पेटला नवा वाद? जाणून घ्या एका क्लिकवर..

NCERT Class 9 Book: दिल्ली विद्यापीठाने नाकारलेला 'मनुस्मृती'चा संदर्भ आता शालेय पुस्तकात? ९ वीच्या 'भारत आणि जग' या नव्या धड्यात महिलांच्या अधिकारांबाबत नेमके काय लिहिले आहे? जाणून घ्या सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 27, 2026 | 11:12 AM
ncert

ncert

Follow Us
Follow Us:

NCERT Class 9 Book Social Science Syllabus Update 2026:  एनसीईआरटीचे (NCERT) इयत्ता ९ वीचे सामाजिक शास्त्राचे पाठ्यपुस्तक सध्या चर्चेचा विषय बनले आहे. या पुस्तकात प्राचीन भारतातील समाजात महिलांची भूमिका आणि सामाजिक व्यवस्था याबद्दल माहिती देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, यामध्ये ‘मनुस्मृती’चा एक संदर्भ जोडण्यात आला आहे. तसेच, काळाच्या ओघात महिलांची स्थिती आणि समाज या दोन्हीमध्ये काय काय बदल झाले, यावरही या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे.

‘मनुस्मृती’च्या श्लोकाचा समावेश

या पुस्तकात मनूस्मृतीमधील एक प्रसिद्ध ओळ ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता’ ही ओळ समाविष्ट करण्यात आली आहे. म्हणजेच ‘जिथे महिलांचा आदर-सन्मान केला जातो, तिथे देवतांचा वास असतो.’ या श्लोकाच्या माध्यमातून महिलांच्या सन्मानाची बाजू मांडण्यात आली आहे. मात्र, सर्वच काळात महिलांची स्थिती एकसारखी राहिली नाही, हेही यात स्पष्ट करण्यात आले आहे. काळ बदलल्याने महिलांच्या भूमिकेत झालेल्या बदलांवर यामध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. समाज आणि राजकारणात जसे बदलत गेले, तशी महिलांची स्थितीही बदलली, असे यात म्हटले आहे.

AI Success Story: वयाच्या १९ व्या वर्षी एआयच्या बळावर दरमहा १ कोटींची कमाई; ‘एंटर्न’ स्टार्टअप उभारणाऱ्या आयुषची गोष्ट एकदा वाचाच

‘भारत आणि जग’ नावाचा नवा धडा

इयत्ता ९ वीच्या या पुस्तकात ‘भारत आणि जग’ (India and the World) नावाचा एक अध्याय समाविष्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये वैदिक काळाविषयी माहिती दिली आहे. या पाठात त्या काळातील महिलांच्या मजबूत स्थितीचे वर्णन करताना सांगितले आहे की, त्या काळात महिलांना शिक्षणाचा पूर्ण अधिकार होता. समाजातील प्रत्येक महत्त्वाच्या कामात महिला भागीदार असायची आणि त्यांना स्वतःचा पती निवडण्याचे स्वातंत्र्य होते. तसेच समाजात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार देण्यात आले होते.

Ayodhya Ram Mandir Row: अयोध्या राम मंदिर कथित दान गैरव्यवहार प्रकरणी SIT चा प्राथमिक अहवाल सादर; कशी होते या विशेष पथकाची निवड?

दिल्ली विद्यापीठातील (DU) जुना वाद

हा नवा धडा अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा नुकताच दिल्ली विद्यापीठाच्या (DU) लॉ फॅकल्टीमध्ये (विधी शाखा) मनुस्मृती शिकवण्याच्या प्रस्तावावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या निर्णयाला तीव्र विरोध झाल्यानंतर डीयूच्या कुलगुरूंनी (Vice Chancellor) तो प्रस्ताव फेटाळून लावला होता. अखेर मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला नाही. मात्र, आता शालेय पातळीवर एनसीईआरटीच्या पुस्तकात याचा संदर्भ आल्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Ncert class 9 book manusmriti shloka vedic period women status controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • Book Release
  • controversy
  • delhi
  • Delhi University
  • education

संबंधित बातम्या

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा
1

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा

दिल्ली हादरली! इस्कॉन मंदिराजवळ १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित सामूहिक बलात्कार; एक आरोपी चकमकीनंतर अटकेत
2

दिल्ली हादरली! इस्कॉन मंदिराजवळ १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित सामूहिक बलात्कार; एक आरोपी चकमकीनंतर अटकेत

Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच
3

Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच

Youth Innovation : DTU ची नवी योजना जाहीर! गावातील समस्यांवर शोधा उपाय अन् मिळवा कोटींचे बक्षीस
4

Youth Innovation : DTU ची नवी योजना जाहीर! गावातील समस्यांवर शोधा उपाय अन् मिळवा कोटींचे बक्षीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.