Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डाव्या हाताने लिहिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी! NTA ने NEET बुकलेट मध्ये केला ‘हा’ खास बदल

परीक्षेदरम्यान स्वाक्षरी आणि पडताळणी यांसारख्या प्रशासकीय बाबींमध्ये आपला मौल्यवान वेळ वाया जात असल्याची तक्रार उमेदवार अनेकदा करतात. तसेच, Physics आणि Chemistry या विषयांच्या मोठ्या आकडेमोडीसाठी प्रश्नपत्रिकेत पुरेशी जागा नसणे हे देखील एक मोठे आव्हान होते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 13, 2026 | 05:53 PM
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET UG 2026 च्या संदर्भात हालचालींना वेग धरला आहे. २१ जून २०२६ म्हणजेच रविवार रोजी होणारी ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर असावी, यासाठी NTA ने अनेक महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. अलीकडच्या काळात विविध वादांमुळे चर्चेत राहिलेली NEET UG परीक्षा आता सुरक्षिततेसोबतच उमेदवारांच्या सोयीलाही प्राधान्य देणार आहे, जेणेकरून परीक्षा कक्षात विद्यार्थ्यांना तणावमुक्त अनुभव घेता येईल.

Government Jobs : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी; सेंट्रल बँकेची 4500 पदांसाठी मेगा भरती

परिक्षेदरम्यान मोठी आव्हानं

परीक्षेदरम्यान स्वाक्षरी आणि पडताळणी यांसारख्या प्रशासकीय बाबींमध्ये आपला मौल्यवान वेळ वाया जात असल्याची तक्रार उमेदवार अनेकदा करतात. तसेच, Physics आणि Chemistry या विषयांच्या मोठ्या आकडेमोडीसाठी प्रश्नपत्रिकेत पुरेशी जागा नसणे हे देखील एक मोठे आव्हान होते. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, NTA ने या वर्षीच्या परीक्षेसाठी ‘टेस्ट बुकलेट’ची रचना पूर्णपणे बदलली आहे. २१ जून २०२६ रोजी NEET UG परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना नेमका कोणत्या बदलाचा सामना करायचा आहे? सविस्तर समजून घेऊयात.

NEET UG 2026: NTA चे 3 मोठे बदल

जर तुम्ही NEET UG री-टेस्टच्या देणार असाल, तर तुम्हाला नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या पूर्ण तयारीची माहिती असली पाहिजे.

1. १८० ऐवजी पूर्ण १९५ मिनिटे

NEET परीक्षेसाठी उमेदवारांना १९५ मिनिटे दिली जातील. NTA ने स्पष्ट केले आहे की, हा संपूर्ण कालावधी केवळ उमेदवारांना परीक्षा देण्यासाठीच राखीव असेल. ही परीक्षा दुपारी २:०० ते सायंकाळी ५:१५ या वेळेत घेतली जाईल. पर्यवेक्षकांच्या स्वाक्षऱ्या, बायोमेट्रिक पडताळणी आणि OMR शीट्स गोळा करणे यांसारख्या सर्व औपचारिक बाबी याच कालावधीत पूर्ण होतील, अशा प्रकारे NTA ने या वेळेचे नियोजन केले आहे. दिव्यांग उमेदवारांना अतिरिक्त ६५ मिनिटे मिळतील, म्हणजेच त्यांची परीक्षा सायंकाळी ६:२० वाजता संपेल.

2. Rough work साठी अतिरिक्त पाने

NEET उमेदवारांसाठी ही एक मोठी दिलासादायक बाब आहे. यापूर्वी, कच्च्या कामासाठी पुरेशी जागा नसायची, त्यामुळे उमेदवारांना अत्यंत लहान अक्षरात लिहावे लागायचे किंवा आधी केलेले हिशोब खोडून पुन्हा लिहावे लागायचे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून, NTA ने प्रश्नपुस्तिकेतील कच्च्या कामासाठीच्या पानांची संख्या दोनवरून चार केली आहे. आता उमेदवारांना अत्यंत क्लिष्ट सूत्रे आणि हिशोब सोडवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असेल.

3. डाव्या हाताने लिहिणाऱ्या उमेदवारांसाठी विशेष रचना

देशातील सुमारे १०% उमेदवार डाव्या हाताने लिहिणारे असतात. पूर्वीच्या प्रश्नपुस्तिकांची रचना उजव्या हाताने लिहिणाऱ्या उमेदवारांचा विचार करून केली जात असे; त्यामुळे डाव्या हाताने लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना कच्च्या कामासाठी वारंवार पाने उलटून प्रश्नपुस्तिकेच्या अगदी शेवटच्या पानांवर जावे लागत असे. यावेळी NTA ने एक नवीन संकल्पना आणली आहे: नवीन रचनेनुसार, सूचनांच्या पानानंतर लगेचच प्रश्नपुस्तिकेच्या सुरुवातीला कच्च्या कामासाठी दोन पाने जोडण्यात आली आहेत. परिणामी, डाव्या हाताने लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना आता प्रश्नपत्रिकेच्या शेवटच्या पानांपर्यंत वारंवार जाण्याची गरज भासणार नाही.

PMRF Fellowship: PhD विद्यार्थ्यांची चांदी! ‘या’ शासकीय फेलोशिपअंतर्गत दरमहा मिळतोय ₹1 लाखांपर्यंतचा स्टायपेंड; जाणून घ्या सविस्तर

Web Title: Nta neet ug exam booklet changes for left handed candidates marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • NEET
  • NEET UG Result

संबंधित बातम्या

Breaking News : Oracle च्या गोंधळाने AI बूमला धक्का; डेटा सेंटर क्षेत्राच्या तेजीचा नाजूक चेहरा समोर
1

Breaking News : Oracle च्या गोंधळाने AI बूमला धक्का; डेटा सेंटर क्षेत्राच्या तेजीचा नाजूक चेहरा समोर

‘Love and War’मध्ये विकी कौशलचा नवा अवतार! दोन दमदार पोस्टर्सनी वाढवली सिनेमाची उत्सुकता
2

‘Love and War’मध्ये विकी कौशलचा नवा अवतार! दोन दमदार पोस्टर्सनी वाढवली सिनेमाची उत्सुकता

Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड
3

Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड

Chikizing Marathi Movie: ‘चिकिझिंग’चं पहिलं पोस्टर झळकलं! ‘या’ तारखेला रंगणार एका छोट्या मुलाच्या मोठ्या स्वप्नाची गोष्ट!
4

Chikizing Marathi Movie: ‘चिकिझिंग’चं पहिलं पोस्टर झळकलं! ‘या’ तारखेला रंगणार एका छोट्या मुलाच्या मोठ्या स्वप्नाची गोष्ट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.