Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये ऑफिसर पदांची मोठी भरती! ७ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची सुवर्णसंधी

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मध्ये जॉइंट डायरेक्टर, रिसर्च सायंटिस्ट आणि डेप्युटी डायरेक्टर अशा विविध अधिकारी पदांवर डेप्युटेशन तत्त्वावर भरती सुरू झाली आहे. जाणून घ्या या पदांविषयी सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 18, 2026 | 06:06 PM
nta

nta

Follow Us
Follow Us:

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) हे नाव गेल्या काही महिन्यांपासून देशभरात प्रचंड चर्चेत आहे. जेईई मेन, नीट यूजी (NEET UG), यूजीसी नेट (UGC NET), सीयूईटी (CUET) यांसारख्या देशातील सर्वात मोठ्या परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी याच एजन्सीवर आहे. आता याच नामांकित एजन्सीमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उमेदवारांना मिळत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने विविध पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. यासाठी एनटीएने अधिकृत भरती अधिसूचना देखील जारी केली आहे.

७ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी

एनटीएच्या या नवीन भरतीसाठी पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर जाऊन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, या भरतीसाठी ७ ऑगस्ट २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे अंतिम तारखेची वाट न पाहता त्यापूर्वीच आपला अर्ज सबमिट करावा.

NTA मधील नोकरीसाठी पात्रता काय आहे?

एनटीएने ही भरती डेप्युटेशन/फॉरेन सर्व्हिसच्या अटींच्या आधारावर काढली आहे. त्यामुळे केवळ तेच कर्मचारी अर्ज करण्यास पात्र आहेत, जे ऑल इंडिया सर्व्हिसेस केंद्र किंवा राज्य सरकारी क्षेत्रात तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (PSU) कार्यरत अधिकारी आहेत. तेच या पदांसाठी अर्ज करू शकतात.

जॉइंट डायरेक्टर : उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी पूर्ण केलेली असावी. तसेच मूळ कॅडर/विभागात नियमित पदावर कार्यरत असावे, किंवा पे-लेव्हल ११ वर ३ वर्षे किंवा पे-लेव्हल १० वर ५ वर्षे नियमित सेवा पूर्ण केलेली असावी. संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी आणि युनिव्हर्सिटी बोर्डाच्या परीक्षा पद्धतीमध्ये काम करण्याचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.

रिसर्च सायंटिस्ट: सायकॉलॉजी / सायकोमेट्रिक / स्टॅटिस्टिक्स / मॅथेमॅटिक्स / टेस्टिंग मेथोडोलॉजी / एज्युकेशन यांपैकी एखाद्या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशनसह पीएचडी (PhD) पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच असेसमेंट सेक्टर किंवा संबंधित क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव असावा आणि मूळ कॅडर किंवा विभागात नियमित पदावर कार्यरत असावे, किंवा समान पदावर कार्यरत असावे, किंवा पे-लेव्हल ११ वर ३ वर्षे किंवा पे-लेव्हल १० वर ५ वर्षे नियमित सेवा केलेली असावी. या पदासाठी सायकोमेट्रिक टेस्टिंगचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य मिळेल.

NEET Result: नीट परीक्षेचा घोळ संपेना! बीडमध्ये सोहम आणि ज्ञानेश्वरीच्या ‘आन्सर की’ आणि गुणपत्रिकेत मोठी तफावत

डेप्युटी डायरेक्टर: कोणत्याही विषयातील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. यासोबतच संबंधित क्षेत्रात याच पदावर कार्यरत असावे, किंवा मूळ कॅडर किंवा विभागात पे-लेव्हल १० वर ३ वर्षे नियमित सेवा पूर्ण केलेली असावी. पदव्युत्तर पदवी आणि परीक्षा पद्धतीचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

असिस्टंट डायरेक्टर: कोणत्याही विषयात बॅचलर डिग्री पूर्ण केलेली असावी. सध्या यांसारख्या पदावर कार्यरत असावे, किंवा पे-लेव्हल ८ वर ३ वर्षे नियमित सेवा किंवा लेव्हल ७ वर ५ वर्षे रेग्युलर सर्व्हिस झालेली असावी. मास्टर्स डिग्रीसह ८ वर्षांचा अनुभव, ज्यापैकी ५ वर्षांचा अनुभव सुपरवायझरी/सुपरिटेंडेंट पे-लेव्हल ७ वर काम करण्याचा असावा, अशा उमेदवारांना प्राधान्य मिळेल.

US Green Card: अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांना मोठा झटका! ग्रीन कार्डसाठी मोजावे लागणार तब्बल ९६ लाख रुपये; ट्रम्प सरकारचा नवा प्लॅन

सीनियर सुपरिटेंडेंट – अकाउंट्स: कोणत्याही विषयात पदवीसह ऑफिस प्रोसिजर, नियम, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन आणि सेक्रेटेरियल प्रॅक्टिसचे ज्ञान असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेसोबतच उमेदवार सध्या याच पदावर कार्यरत असावा, किंवा पे-लेव्हल ६ वर ३ वर्षे रेग्युलर सर्व्हिस किंवा लेव्हल ५ वर ५ वर्षे रेग्युलर सर्व्हिसमध्ये असावा. या पदासाठी अकाउंट्स, ऑडिट, ॲडमिनिस्ट्रेशन, लीगल, स्टोअर मॅनेजमेंट यांसारख्या क्षेत्रांत ५ वर्षांचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा: या सर्व पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे कमाल वय ५६ वर्षांपर्यंत असावे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

Web Title: Nta recruitment 2026 joint director research scientist deputy director vacancies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 06:06 PM

Topics:  

  • central goverment
  • government jobs
  • Jobs Recruitment

संबंधित बातम्या

Mumbai University Recruitment 2026:  प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार!  मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू
1

Mumbai University Recruitment 2026: प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार! मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू

DY Patil Education Society मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी; ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज
2

DY Patil Education Society मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी; ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज

Amazon मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! सणासुदीच्या काळात 160000 हून अधिक जागांची भर्ती, मिळणार विशेष लाभ
3

Amazon मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! सणासुदीच्या काळात 160000 हून अधिक जागांची भर्ती, मिळणार विशेष लाभ

Govt New Sugar Rules : साखरेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी उचललं पाऊल
4

Govt New Sugar Rules : साखरेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी उचललं पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.