फोटो सौजन्य - Social Media
हरियाणाच्या नूंह जिल्ह्यातील पोलीस विभागात स्पेशल पोलीस ऑफिसर (SPO) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. हरियाणा पोलीस कायदा, 2007 च्या कलम 21 नुसार ही भरती केली जात असून एकूण 120 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती प्रामुख्याने माजी सैनिक, विसर्जित HISF बटालियनचे माजी सदस्य आणि हरियाणा आर्म्ड पोलीस (HAP) किंवा इंडिया रिझर्व बटालियन (IRB) मधील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आहे.
भरती प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत १४ मे २०२५ पासून सुरू होणार असून ३० मे २०२५ पर्यंत उमेदवारांना प्रत्यक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय, नूंह येथे उपस्थित राहून अर्ज सादर करावा लागेल. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया संपूर्णतः ऑफलाइन आहे. पोस्ट किंवा ऑनलाईन अर्ज मान्य केले जाणार नाहीत.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी माजी सैनिक किंवा HAP/HISF/IRB मधील निवृत्त कर्मचारी असणे आवश्यक आहे. अर्ज सादर करताना उमेदवाराचे वय किमान 25 आणि कमाल 50 वर्षांच्या दरम्यान असावे. वयातील सवलत हरियाणा शासनाच्या नियमानुसार लागू केली जाईल. SPO पदासाठी उमेदवारांची निवड दोन टप्प्यांत केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये वैद्यकीय तपासणीचा समावेश आहे. उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रे, ओळखपत्रे आणि स्वयंप्रमाणित छायांकित प्रती सोबत घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहावे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 मे आहे आणि अंतिम निवड यादी 4 जून 2025 रोजी कार्यालयात प्रसिद्ध केली जाईल.
महत्त्वाचे तपशील:
या भरतीच्या माध्यमातून स्पेशल पोलीस ऑफिसर (SPO) पदासाठी उमेदवारांना नियुक्त करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये एकूण १२० रिक्त जागांचा विचार करण्यात येणार आहे. उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करता येणार असून उमेदवारांची प्रत्यक्ष हजेरी आवश्यक असणार आहे. १४ मे २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० मे निश्चित करण्यात आली आहे. या भरतीचा निकाल 04 जून २०२५ रोजी जाहीर करण्यात येईल. ही भरती नूंह विभागात सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि अनुभवी कर्मचाऱ्यांच्या सहभागासाठी एक उत्तम संधी ठरणार आहे.