Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Career News: शैक्षणिक मास्टरस्ट्रोक! आता जिल्हा परिषद शाळांचा १० वी पर्यंत विस्तार; ग्रामीण विद्यार्थ्यांची चिंता मिटली

पुणे जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद शाळांचा १० वी पर्यंत विस्तार करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. रोबोटिक्स लॅब्स आणि आधुनिक सुविधांमुळे आता झेडपी शाळा खासगी शाळांना टक्कर देणार आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 24, 2026 | 09:00 PM
आता जिल्हा परिषद शाळांचा १० वी पर्यंत विस्तार

आता जिल्हा परिषद शाळांचा १० वी पर्यंत विस्तार

Follow Us
Follow Us:

 

  • शैक्षणिक मास्टरस्ट्रोक!
  • आता जिल्हा परिषद शाळांचा १० वी पर्यंत विस्तार
  • ग्रामीण विद्यार्थ्यांची चिंता मिटली
पुणे, शहर प्रतिनिधी: पुणे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील शिक्षणाचा कायापालट करण्यासाठी एक मोठा ‘मास्टरस्ट्रोक’ मारला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता केवळ प्राथमिक शिक्षणच नाही, तर चक्क १० वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाच्या या धडाक्यामुळे ग्रामीण भागातील, विशेषतः शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाची वारी आता त्यांच्या घरापर्यंत पोहचली असून, ‘ड्रॉप आऊट’च्या संकटाला कायमचा चाप बसणार आहे.

शिक्षणाची ‘वारी’ आता घराच्या दारी !

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. अनेक गावांमध्ये माध्यमिक शाळा लांब असल्याने, विशेषतः मुलींना १० वी पूर्वीच शिक्षण सोडावे लागत होते. पालकांची ही अडचण ओळखून आता स्थानिक गरजेनुसार आणि विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शाळांचा दर्जा वाढवण्यात येत आहे.

Exclusive Series : मुली-महिलांवरील अन्याय थांबवण्यासाठी आयपीएस अधिकारी होण्याचे आरतीचे स्वप्नं

रोबोटिक्स आणि अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड

केवळ वर्गच वाढवले जात नसून, या शाळांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोडही दिली जात आहे. जिल्ह्यात १०० हून अधिक शाळांमध्ये रोबोटिक्स, AR-VR आणि सायन्स लॅब्स उभारून जिल्हा परिषद शाळा आता खाजगी शाळांना टक्कर देण्यास सज्ज झाल्या आहेत. तसेच, पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे सुरू झालेली ‘ज्योती सावित्री’ ही पहिली जिल्हा परिषद सीबीएसई (CBSE) शाळा या परिवर्तनाचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

पालकांचा विश्वास वाढला

‘ग्रामीण पुण्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गावाजवळच सातत्यपूर्ण शिक्षण मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे,’ अशा शब्दांत मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रशासनाचा निर्धार व्यक्त केला. या निर्णयामुळे पालकांचा सरकारी शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला असून, जिल्हा परिषद शाळा आता खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ आणि ‘स्वयंपूर्ण’ होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

“मराठी शाळा बंद पाडण्याचे शिक्षण विभागाचे षड्यंत्र”; आमदार ज. मो. अभ्यंकर यांचा खळबळजनक आरोप

Web Title: Pune zp schools to expand up to 10th standard robotics and modern labs facility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • Career News
  • Pune Zilla Parishad
  • ZP School

संबंधित बातम्या

Engineering Admission 2026 : राज्यात चौथ्या फेरीअखेर 1.52 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश; कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती
1

Engineering Admission 2026 : राज्यात चौथ्या फेरीअखेर 1.52 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश; कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती

खासगी शिकवणी केंद्रांसाठीच्या नव्या कायद्यावर 11 हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
2

खासगी शिकवणी केंद्रांसाठीच्या नव्या कायद्यावर 11 हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.