फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Railway Recruitment 2026 : रेल्वे भरती बोर्डाने (RRB) एनटीपीसी अंडरग्रॅज्युएट भरती २०२६ ची शॉर्ट नोटिफिकेशन जारी केली आहे. या भरतीद्वारे विविध झोनमधील नॉन-टेक्निकल पाॅपुलर कॅटगरीच्या (NTPC) अंडरग्रॅज्युएट लेव्हलच्या १,६८८ रिक्त जागा भरल्या जातील. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया १५ ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि उमेदवार १३ नोव्हेंबर रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत अर्ज करू शकतील. ही भरती CEN 07/2026 अंतर्गत केली जात आहे. रेल्वेकडून याबाबतची सविस्तर नोटिफिकेशन १४ ऑक्टोबर रोजी जारी केली जाईल.
आरआरबी एनटीपीसी यूजी (UG) भरती अंतर्गत ४ प्रकारची पदे समाविष्ट आहेत. यामध्ये ट्रेन क्लर्कचे १८८, कमर्शियल कम तिकीट क्लर्कचे ७००, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्टचे २०० आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टच्या ६०० पदांचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण १,६८८ रिक्त जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. कमर्शियल कम तिकीट क्लर्क पदाचा सुरुवातीचा पगार २१,७०० रुपये आहे, तर ट्रेन क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टचा सुरुवातीचा पगार १९,९०० रुपये आहे. या पदांवर ७ व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार वेतन आणि भत्ते दिले जातील.
अंडरग्रॅज्युएट लेव्हलच्या या पदांसाठी उमेदवाराचे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी पास असणे आवश्यक आहे. अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट पदांसाठी कॉम्प्युटरवर हिंदी किंवा इंग्रजीमध्ये टायपिंगचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे. उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२७ रोजी १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच, सरकारी नियमांनुसार आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
Sports Quota: क्रीडापटूंसाठी खूशखबर! CRPF मध्ये ५२१ जागांवर भरती; कोणतीही लेखी परीक्षा नाही
उमेदवार आरआरबीच्या अधिकृत अर्ज पोर्टलद्वारे किंवा संबंधित प्रादेशिक आरआरबी वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जासाठी आधी नवीन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करून वैयक्तिक, शैक्षणिक आणि इतर आवश्यक माहिती भरावी लागेल. फॉर्ममध्ये फोटो, स्वाक्षरी आणि गरजेनुसार प्रमाणपत्रे अपलोड करावी लागतील. यानंतर निश्चित केलेली फी भरून अर्ज सबमिट करावा लागेल. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रत डाऊनलोड करून सुरक्षित ठेवण्याचा सल्ला उमेदवारांना देण्यात आला आहे.
आरआरबी एनटीपीसी यूजी भरतीमध्ये उमेदवारांना अनेक टप्प्यांतून जावे लागेल.
सीबीटी १ (CBT 1): यात १०० प्रश्न असतील आणि परीक्षेसाठी ९० मिनिटे मिळतील. यामध्ये जनरल अवेअरनेसचे ४०, गणिताचे ३० आणि जनरल इंटेलिजन्स अँड रीझनिंगचे ३० प्रश्न असतील.
सीबीटी २ (CBT 2): पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी सीबीटी २ परीक्षा होईल, ज्यामध्ये १२० प्रश्न असतील. यामध्ये जनरल अवेअरनेसचे ५०, गणिताचे ३५ आणि रीझनिंगचे ३५ प्रश्न समाविष्ट असतील.
टायपिंग टेस्ट: टायपिंगची गरज असलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांना टायपिंग स्किल टेस्ट द्यावी लागेल.
कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा: अंतिम टप्प्यात कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा होईल.






