चिनी अब्जाधीशाचा अनोखा ध्यास: १०० मुलांचा बाप, आता मस्कच्या घरी प्रस्ताव पाठवण्याची तयारी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Chinese billionaire Xu Bo 100 children story : जगातील अब्जाधीशांच्या विचित्र सवयी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात, पण चीनमधील एका टेक टायकूनने (Tech Tycoon) जे काही केलं आहे, ते पाहून जगभरातील लोकांचे डोळे विस्फारले आहेत. चीनमधील प्रसिद्ध मोबाईल गेमिंग कंपनी ‘डुओयी नेटवर्क’चे (Duoyi Network) संस्थापक आणि अध्यक्ष झू बो (Xu Bo) सध्या आपल्या संपत्तीमुळे नाही, तर आपल्या १०० हून अधिक मुलांमुळे चर्चेत आले आहेत. ४८ वर्षांच्या या अब्जाधीशाचा दावा आहे की, जितकी जास्त मुले, तितके साम्राज्य सुरक्षित!
वॉल स्ट्रीट जर्नलने प्रसिद्ध केलेल्या एका खळबळजनक अहवालानुसार, झू बो यांनी जगभरात विविध सरोगेट मातांच्या मदतीने १०० पेक्षा जास्त मुलांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे, यातील अनेक मुले अमेरिकेत जन्माला आली आहेत. झू बो यांच्या मते, ही केवळ मुले नसून त्यांचे ‘लष्करी आणि व्यावसायिक वारस’ आहेत. सध्या अनेक सरोगेट माता त्यांच्या आणखी २० मुलांच्या प्रतीक्षेत आहेत. पावेल दुरोव सारख्या जागतिक व्यक्तींपासून प्रेरित होऊन झू बो यांनी ही “लोकसंख्या वाढवण्याची मोहीम” हाती घेतली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Khaleda Zia: PM मोदींचा ‘तो’ खास संदेश! खालिदा झियांचे सुपुत्र तारिक रहमान व S. Jaishankar यांच्या भेटीने जागतिक राजकारणात खळबळ
झू बो केवळ मुलांची संख्या वाढवून थांबणार नाहीत, तर त्यांना जगातील सर्वात शक्तिशाली लोकांशी संबंध जोडायचे आहेत. एका न्यायालयीन सुनावणी दरम्यान त्यांनी व्यक्त केलेली इच्छा सर्वात जास्त चर्चेत राहिली. झू बो यांना आपल्या मुलांचे लग्न एलोन मस्क (Elon Musk) यांच्या मुलांशी करायचे आहे. मस्कच्या बुद्धिमत्तेचा आणि आपल्या संपत्तीचा वारसा एकत्र आला तर जगावर राज्य करणे सोपे जाईल, असे त्यांचे अजब तर्कशास्त्र आहे. जागतिक स्तरावर एक अभेद्य ‘ब्लडलाईन’ तयार करण्याचे त्यांचे हे स्वप्न आहे.
Philo-Semitism! WSJ: Chinese billionaire Xu Bo reportedly has 100+ sons born through surrogacy+IVF. He prefers eggs from Jewish women. Elites are aggressively using IVF + embryo screening technology. What do they know that you don’t? pic.twitter.com/x8bCJjbK16 — steve hsu (@hsu_steve) December 14, 2025
credit : social media and Twitter
झू बो यांची एकूण संपत्ती सुमारे १.१ अब्ज डॉलर्स (सुमारे ९१०० कोटी रुपये) आहे. एवढ्या मोठ्या साम्राज्याचा कारभार सांभाळण्यासाठी त्यांना किमान २० अत्यंत हुशार आणि ‘हाय-क्वालिटी’ अमेरिकन वारस हवे आहेत. झू बो यांच्या मते, समाजात आणि व्यवसायात येणाऱ्या सर्व समस्यांवर एकच जालीम उपाय आहे, तो म्हणजे ‘मुलांची संख्या वाढवणे’. त्यांनी आपल्या वेइबो (Weibo) पोस्टमध्ये वारंवार अशा स्त्रियांचा शोध घेण्याबद्दल भाष्य केले आहे ज्या “उच्च दर्जाच्या” मुलांना जन्म देऊ शकतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sydney Fireworks: सिडनीचा शांतता संदेश; Bondi हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ आकाशात होणार जगातील सर्वात मोठी आतिषबाजी
झू बो यांच्या खासगी आयुष्यात वादांचे मोहोळ उठले आहे. त्यांच्या एका माजी प्रेयसीने असा दावा केला आहे की, झू बो यांना प्रत्यक्षात ३०० मुले आहेत. अर्थात, त्यांच्या कंपनीने हा दावा नाकारला असला तरी त्यांनी १०० मुलांची कबुली दिली आहे. त्यापैकी १२ मुले अमेरिकन नागरिक आहेत. हा संपूर्ण प्रकार आता केवळ वैयक्तिक राहिला नसून चीन आणि अमेरिकेत कायदेशीर आणि नैतिक वादाचा विषय बनला आहे. सरोगसीच्या माध्यमातून अशा प्रकारे मुलांची फौज तयार करणे नैतिक की अनैतिक, यावर सोशल मीडियावर दोन तट पडले आहेत.
Ans: झू बो हे चीनमधील आघाडीच्या डुओयी नेटवर्क (Duoyi Network) या मोबाईल गेमिंग कंपनीचे संस्थापक आणि अब्जाधीश अध्यक्ष आहेत.
Ans: अधिकृत माहितीनुसार त्यांना १०० मुले आहेत, मात्र त्यांच्या माजी प्रेयसीने ही संख्या ३०० असल्याचा दावा केला आहे.
Ans: आपले व्यावसायिक साम्राज्य जागतिक स्तरावर मजबूत करण्यासाठी त्यांना आपल्या मुलांचे लग्न एलोन मस्कच्या मुलांशी लावून मोठी युती करायची आहे.






