फोटो सौजन्य - Social Media
राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC)ने नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET) २०२५ या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी दिली आहे. एकंदरीत, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET) २०२५ साठी पाठयक्रम जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना या पाठयक्रमाचा आढावा घेता येणार आहे. पाठयक्रम ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. या पाठयक्रमाचा आढावा घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी NMC च्या nmc.org.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. हा पाठयक्रम २०२५ साठी असून इच्छुक उमेदवारांनी त्याचा अभ्यास करावा.
वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्याची किंवा करिअर करू पाहण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम डाउनलोड करता येईल. खाली दिलेल्या सूचना पाळून सिलेबस डाउनलोड करा:
या संदर्भात NMC ने एक नोटीस जाहीर केली आहे. या अधिसूचनेमध्ये एक महत्वाची माहिती नमूद करण्यात आली आहे. नोटीसमध्ये सांगितले गेले आहे कि “सर्व हितधारक, विशेषत: इच्छुक उमेदवारांना कळवण्यात येते की नॅशनल मेडिकल कमिशन अंतर्गत एक स्वायत्त संस्था असलेल्या अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्डाने NEET (UG)-2025 साठीचा अभ्यासक्रम अंतिम केला आहे.”
आयोगाने सांगितले, “हा अभ्यासक्रम सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी NMCच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आला आहे. सर्व हितधारकांना सल्ला देण्यात येतो की NEET (UG)-2025 साठी अद्ययावत अभ्यासक्रम पाहून शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीच्या NEET (UG) परीक्षेची तयारी आणि अभ्यास साहित्य तयार करावे.”
भौतिकशास्त्र (Physics): महत्त्वाचे घटक: मापन आणि गणना, गतीशास्त्र, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा आणि शक्ती, गुरुत्वाकर्षण, स्थायुरचना व द्रवरूप गुणधर्म, थर्मोडायनॅमिक्स, दोलन आणि तरंग, विद्युतधारा आणि चुंबकीय प्रभाव, आदी.
रसायनशास्त्र (Chemistry): विभाग: सेंद्रिय (Organic), असेंद्रिय (Inorganic) आणि भौतिक (Physical) रसायनशास्त्र.
भर: रासायनिक अभिक्रिया आणि संयुगे.
जीवशास्त्र (Biology): घटक: जनुकशास्त्र (Genetics), पर्यावरणशास्त्र, पेशींची रचना, वनस्पती व प्राणी शारीरशास्त्र, जैवतंत्रज्ञान, इत्यादी.
अभ्यासक्रम अद्यतनित केला गेला आहे, त्यामुळे परीक्षेच्या तयारीसाठी योग्य अभ्यास साहित्य निवडणे गरजेचे आहे. परीक्षेसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांनी अभ्यास करताना NEET 2025 च्या नवीन अभ्यासक्रमाचा आधार घ्या.