फोटो सौजन्य - Social Media
बॉर्डर सेक्युरिटी फोर्स (BSF)मध्ये भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. BSF मध्ये काम करू पाहणार्या किंवा भरती होऊ पाहणार्या उमेदवारांना या भरतीचा लाभ घेता येणार आहे. या भरती संदर्भांत अधिक आणि सखोल माहिती अधिसूचनेत नमूद आहे. या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचनाही जाहीर करण्यात आले आहे. मुळात, ही भरती सुरु असून मोठ्या संख्येने उमेदवार या भरतीसाठी अर्ज करत आहेत. स्पेशालिस्ट आणि जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसरच्या पदासाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात स्वीकारले जात आहेत. उमेदवारांना BSF च्या bsf.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे. चला तर मग, या भरतीविषयी अधिक खोल जाणून घेऊयात.
एकूण २५ रिक्त जागांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. १८ डिसेंबरपर्यंत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहात तर लवकरात लवकर अर्ज करा, अन्यथा वेळ निघून केल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरतीमध्ये जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (GDMO) पदाच्या 9 रिक्त जागांचा समावेश आहे. तर सर्जन, स्त्री रोग विशेषज्ञ, रेडियोलॉजिस्ट, पैथोलॉजिस्ट, एनेस्थिसियोलॉजिस्ट, नेत्र रोग विशेषज्ञ या विभागांमध्ये स्पेशालिस्ट असणाऱ्या १६ उमेदवारांची नियुक्ती या भरतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तर या क्षेत्रांमध्ये कौशल्य आणि शिक्षण असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
BSF ने जाहीर अधिसूचनेत काही अटी शर्तीची तरतूद केली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यास पात्र होण्यासाठी या अटी शर्तीना पात्र असणे अनिवार्य आहे. या अटी शर्ती उमेदवारांच्या शिक्षणासंदर्भात आहेत तर वयोमर्यादे संदर्भात आहेत. मुळात, या भरतीसाठी जास्तीत जास्त ६७ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे. यापेक्षा जास्त वय असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही. अधिसूचनेमध्ये नमूद शैक्षणिक अटीनुसार, GDMO च्या पदासाठी उमेदवार MBBS असावा आणि त्याकडे इंटर्नशिपचे प्रमाणपत्र असावे. तर स्पेशालिस्ट पदासाठी अर्ज करणारा उमेदवार संबंधित क्षेत्रामध्ये PG डिग्री पूर्ण केलेला असावा किंवा डिप्लोमा धारक उमेदवारांनाही या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. जर उमेदवार PG पूर्ण असेल तर त्याच्याकडे किमान १.५ वर्षांचे अनुभव असणे अनिवार्य आहे. तर डिप्लोमा धारकांकडे २.५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
BSF च्या या भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही परीक्षेला सामोरे जावे लागणार नाहीये. वॉक इन इंटरव्हिव्हच्या माध्यमातून उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल. अधिक माहितीसाठी जाहीर अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.