रक्तात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे
कोलेस्ट्रॉलचे प्रकार कोणते?
उच्च कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे?
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय खावे?
दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला ताण, अवेळी जेवण, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. शरीरातील प्रत्येक अवयवांचे कार्य निरोगी असेल तर शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. पण रक्तप्रवाह किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीरात असंख्य बदल जाणवू लागतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणाऱ्या बदलांच्या परिणामुळे आरोग्य बिघडते आणि खराब कोलेस्ट्रॉलसारख्या समस्या उद्भवतात.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक म्हणजे चांगले आणि वाईट कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात हेल्दी फॅट्स तयार करतात. तर वाईट कोलेस्ट्रॉल शरीरात आवश्यक चरबी तयार करते. शरीरात वाढलेली अनावश्यक चरबी रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन राहते, ज्याच्या परिणामांमुळे हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन पुरवठा होत नाही. वाईट कोलेस्ट्रॉल लिव्हरमध्ये तयार होणारा मेणाचा चिकट पदार्थ असतो, जो हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चिकटून राहतो. बैठी जीवनशैली आणि अतितिखट तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. रक्तात साचून राहिलेली खराब चरबी भविष्यासाठी चिंतेचा विषय ठरू शकते. खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो.
शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. हृदयाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो. याशिवाय कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मांस, लोणी, चीज आणि इतर फूल फॅट डेअर प्रोडक्ट्स यांसारख्या चरबी असलेल्या पदार्थांचे सेवन न करता फायबरयुक्त पदार्थ खावेत. बीन्स, भेंडी, वांगी, नट्स, ओट्स, कडधान्ये, सफरचंद, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, फॅटी फिश आणि पेरू यांसारख्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. फायबर शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर लसूण खावा. कच्चा लसूण खाल्ल्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते. याशिवाय आहारातून तेल आणि साखर पूर्णपणे बंद करावी.
Ans: कोलेस्टेरॉल हा शरीरातील पेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असा मेणासारखा पदार्थ आहे, जो यकृतामध्ये तयार होतो आणि अन्नातूनही मिळतो. याचे जास्त प्रमाण आरोग्यासाठी हानिकारक आहे.
Ans: 100 mg/dL 1 0 0 m g / d L पेक्षा कमी, 60 mg/dL 6 0 m g / d L किंवा त्याहून अधिक
Ans: सामान्यतः कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, म्हणूनच याला "सायलेंट किलर" म्हणतात. मात्र, खूप वाढल्यास छातीत दुखणे, धाप लागणे, किंवा त्वचेवर पिवळसर डाग दिसू शकतात.






