Maharashtra breaking News Marathi (Credit- AI)
23 Feb 2026 10:31 AM (IST)
जगातील सर्वात क्रूर आणि ‘वॉन्टेड’ ड्रग्ज तस्करांच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या नेमेसियो रुबेन ओसेगुएरा सर्व्हेंटेस उर्फ “एल मेंचो” (El Mencho) याचा लष्करी कारवाईत अंत झाला आहे. मेक्सिकोच्या (Mexico) संरक्षण मंत्रालयाने या ऐतिहासिक मोहिमेची माहिती दिली असून, या बातमीने संपूर्ण दक्षिण अमेरिकेत खळबळ उडाली आहे. एल मेंचोच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी त्याच्या टोळीने मेक्सिकोच्या रस्त्यांवर हिंसाचाराचा तांडव सुरू केला आहे.
23 Feb 2026 10:24 AM (IST)
“द केरळ स्टोरी २” या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. ट्रेलरमध्ये एका मुस्लिम कुटुंबाकडून मुख्य भूमिकेतील अभिनेत्रीला जबरदस्तीने गोमांस खायला घातले जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट २७ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. रविवारी, अभिनेता प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर चित्रपटाभोवती सुरू असलेल्या वादाबद्दल ट्विट केले आहे.
23 Feb 2026 10:19 AM (IST)
मुलींच्या अत्याचाराच्या घटनेने देशाला शरमेने मान घालावी लागली अशा घटना या आधी घडल्या आहेत. निर्भया बलात्कार आणि हत्याकांड हा प्रकरण अजूनही आपण विसरू शकलो नाही आहे. अजूनही ते प्रकरण आठवलं कि अंगावर शहारे येतात. एखादा व्यक्ती इतका कसा काय क्रूर असो शकतो? तो मनुष्य आहे की नाही? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. आता असाच एक प्रकार गुरुग्राममध्ये देखील घडला आहे. एका नराधमाने आधी त्या मुलीला बंदी बनवून ठेवलं, त्यानंतर अमानुष मारहाण केली, एवढेच नाही तर सॅनिटायझरने तिचा प्रायव्हेट पार्ट जाळला. यामुळे ती कधीच आई होऊ शकणार नाही आणि एवढेच नाही तर तिला कधीच चालताही येणार आहे.
23 Feb 2026 09:45 AM (IST)
सातारा: सातारा तालुक्यातील लिंब येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या 'उदयनराजे केसरी' भव्य बैलगाडा शर्यतीत 'बकासूर आणि बादल' या बैलजोडीने बाजी मारली आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या शर्यतीत या जोडीने आपल्या वेगाच्या जोरावर प्रथम क्रमांकावर नाव कोरले.
रक्षक प्रतिष्ठानचे सुशील मोझर यांच्या वतीने या ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन दरवर्षी केले जाते. यावर्षीच्या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरलेल्या प्रथम क्रमांकाच्या १,५१,००७ रुपयांच्या रोख बक्षिसावर बकासूर आणि बादल जोडीने कब्जा केला.
23 Feb 2026 09:39 AM (IST)
Harshvardhan Sapkal News: “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि घाशीराम कोतवाल यांची कार्यपद्धती सारखीच आहे. पुण्याचे प्रथम नागरिक आंदोलनामध्ये पक्ष म्हणून सहभागी होतात, परंतु रामशास्त्री प्रभुणे यांच्या पुण्याचा भाजपकडून तालिबान केला आहे,” असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्याक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान सोबत केल्याचा आरोप करत भाजपच्या पुणे शहर संघटनेने काँग्रेस भवनावर मोर्चा काढला होता.
23 Feb 2026 09:25 AM (IST)
मुंबई: 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन सध्या कमालीच्या वळणावर येऊन पोहोचला आहे. घरातील सदस्यांमधील वाद, एकमेकांविरुद्धची रणनीती आणि बदललेली समीकरणे यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, खेळाकडे गांभीर्याने न बघणे एका स्पर्धकाला चांगलेच महागात पडले असून, सहाव्या आठवड्यात एका सदस्याचा प्रवास संपला आहे.
सहाव्या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रिया अत्यंत चुरशीची ठरली होती. घराबाहेर जाण्यासाठी तब्बल नऊ स्पर्धक शर्यतीत होते: रोशन, सागर, राकेश, दीपाली, अनुश्री, रुचिता, सचिन, प्रभू आणि प्राजक्ता. या सर्वांमध्ये 'वोटिंग ट्रेंड्स'नुसार कोण वाचणार आणि कोणाचा निरोप मिळणार, याची चर्चा संपूर्ण आठवडाभर सोशल मीडियावर रंगली होती.
23 Feb 2026 09:20 AM (IST)
भंडारा/चंद्रपूर: देशात विकासाचे मोठे दावे केले जात असताना, महाराष्ट्र-चंद्रपूरच्या सीमेवर मात्र एक विदारक वास्तव पाहायला मिळत आहे. भंडारा जिल्ह्यातील ईटान आणि चंद्रपूर जिल्ह्यातील कोलारी, ही दोन गावे स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत. आजही येथील ग्रामस्थांना वैनगंगा नदी ओलांडण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावून 'नावेतून' प्रवास करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, ही दोन्ही गावे राज्याच्या राजकारणातील बड्या नेत्यांच्या कार्यक्षेत्रात येतात:
ईटान (भंडारा): हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा गृह मतदारसंघ (साकोली) आहे.
कोलारी (चंद्रपूर): हा भाजपचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय बंटी भांगडिया यांचा मतदारसंघ (चिमूर) आहे.
23 Feb 2026 09:15 AM (IST)
मुंबई: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असतानाच, राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या मृत्यूच्या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना घेरले आहे.
रोहिणी खडसे यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सर्वपक्षीय आमदारांना आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अजित पवार यांच्या मृत्यूमागे काही गूढ दडलेले आहे का, हे समोर आणण्यासाठी सर्व पक्षांच्या आमदारांनी अधिवेशनात सरकारला जाब विचारला पाहिजे.या प्रकरणातील संभ्रम दूर करण्यासाठी सरकारने ठोस उत्तर देणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
23 Feb 2026 09:08 AM (IST)
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवकांच्या (Co-opted Councilors) निवडीवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबईत २९ जागांवर विजय मिळवत आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. या संख्याबळानुसार शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या दोन स्वीकृत नगरसेवक पदांपैकी पहिल्या जागेवर राज सुर्वे यांची वर्णी लागली आहे.
23 Feb 2026 09:04 AM (IST)
India vs South africa Live Score : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुपर 8 चा तिसरा सामना खेळवला जात आहे. भारताचे संघाने पावर प्ले मध्ये जबरदस्त सुरुवात केली पण त्यानंतर डेव्होल्ड ब्रेविस आणि डेविड मिलर या दोघांची जबरदस्त भागीदारी पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिले फलंदाजी करत पहिला इनिंग मध्ये सात विकेट्स गमावून 187 धावा केल्या आहेत. भारतीय संघाला विजयासाठी 188 धावांची गरज आहे.
23 Feb 2026 08:58 AM (IST)
भारतीय बाजारातील आपली पकड मजबूत करण्यासाठी Nissan ने नवी Nissan Gravite MPV लाँच केली आहे. ही एक कॉम्पॅक्ट 7-सीटर कार असून खास कुटुंबासाठी डिझाइन करण्यात आली आहे. कमी किमतीत उत्तम जागा, आधुनिक फीचर्स आणि सुरक्षितता देण्याचा कंपनीचा दावा आहे. तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.65 लाख रुपये ठेवण्यात आली असून त्यामुळे ती देशातील सर्वात किफायतशीर 7-सीटर कार्सपैकी एक ठरते.
Nissan Gravite ही Renault Triber वर आधारित असल्याचे मानले जाते; मात्र यात अधिक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये इंटीग्रेटेड ड्युअल डॅशकॅम मिळतो, जो ड्राइव्हदरम्यान व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. याशिवाय JBL चा प्रीमियम साउंड सिस्टम देण्यात आला आहे, ज्यामुळे संगीताचा अनुभव अधिक उत्कृष्ट होतो. केबिनमधील हवा शुद्ध ठेवण्यासाठी इन-बिल्ट एअर प्युरिफायरही देण्यात आला आहे. हे खास फीचर्स Tekna ट्रिममध्ये उपलब्ध असून, सेगमेंटमध्ये तिला वेगळी ओळख देतात.
23 Feb 2026 08:54 AM (IST)
Washington Sundar-David Miller : २०२६ च्या टी-२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने भारताला पहिला पराभव दिला. या महत्त्वाच्या सुपर ८ सामन्यात भारतीय फलंदाज अपयशी ठरले आणि त्यांना ७६ धावांनी पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा नायक डेव्हिड मिलर होता. सामन्यादरम्यान एका क्षणी मिलरचा राग भडकला आणि तो वॉशिंग्टन सुंदरशी वाद घालू लागला. हाय-व्होल्टेज नाट्यमय वातावरणात पंचांनी हस्तक्षेप केला.
23 Feb 2026 08:53 AM (IST)
Donald Trump News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. ट्रम्प यांच्या मार-ए-लागोतील खाजगी निवासस्थानी एका अज्ञात तरुणाने सशस्त्र घुसखोरीचा प्रयत्न केला. परंतु त्याला सुरक्षा दलांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत ठार केले. मात्र या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
Todays Gold-Silver Price: सोनं-चांदी खरेदीचा विचार करताय?
Gold Rate Today: भारतात 23 फेब्रुवारी रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,927 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,599 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,945 रुपये आहे. भारतात 23 फेब्रुवारी रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,45,990 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,59,270 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,19,450 रुपये आहे. भारतात 23 फेब्रुवारी रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 274.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,74,900 रुपये आहे.






