Trump यांच्या सुरक्षेत पुन्हा मोठी चूक! मार-ए-लागोतील निवास्थानी पेट्रोल आणि बंदुकीसह हल्लेखोराची एन्ट्री अन्...(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, एका २० ते २५ वर्षाच्या तरुणाने बंदूक आणि पेट्रोलसह ट्रम्प यांच्या निवासस्थानात घुसखोरी केली होती. परंतु सुरक्षा दलांनी त्याला वेळीच रोखले. परिस्थिती बिकट झाली होती यामुळे अमेरिकेच्या सीक्रेट सर्व्हिस आणि पाम बीच काऊंटी शेरीफच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात घुसखोऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेवेळी ट्रम्प निवासस्थानात होते का याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
या घटनेनंतर अमेरिकेतील सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. FBI, यूएस सीक्रेट सर्व्हिस आणि पाम बीच काऊंटी शेरीफ ऑफिसने संयुक्तपणे या घटनेची तपासणी करत आहेत. सध्या तरुण ट्रम्प यांच्या निवासस्थानात कसा घुसला, त्याचा हेतू काय होता या सर्व पैलूंची सखोल चौकशी केली जात आहे. मात्र या घटनेमुळे ट्रम्प यांच्या सुरक्षेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.
मार-ए-लागो येथील निवासस्थान ट्रम्प यांचे खाजगी निवासस्थान नसून अतिउच्च सुरक्षेचा परिसर आहे. अशा परिसरात बंदुक आणि पेट्रोलसह अज्ञात तरुणाची घुसखोरी अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत आहे. राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेत ही मोठी चूक मानली जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्नाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहे. सप्टेंबर 2024 मध्ये पेस्ट पाम बीच येथील ट्रम्प इंटरनॅशनल गोल्फ क्लबमध्ये त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात आरोपी रयान रुथ याला जन्मठेप सुनावण्यात आली. तसेच १३ जुलै २०२४ रोजी निवडणुक प्ररचाराच्या रॅलीदरम्यान ट्रम्प यांच्यावर थेट गोळीबार करण्यात आला होता. यावेळी गोळी अध्यक्षांच्या कानाला लागून गेली होती.
यांनतर गेल्या वर्षी २०२५ मध्ये ट्रम्पवर हल्ल्यांचे सत्र सुरुच होते. १५ जुलै २०२५, व्हाइट हाऊसमध्ये एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. अध्यक्षांवर सततच्या वाढत्या हल्ल्यांच्या घटना आणि घुसखोरीचा घटांनामुळे ट्रम्प यांच्या सुरक्षेत नेमकी चूक कुठे होत आहे अशा चर्चांणा उधाण आहे.
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फ्लोरिडातील मार-ए-लागो येथील निवासस्थानावर हल्ला झाला आहे.
Ans: मिळालेल्या माहितीनुसार, एका २० ते २५ वर्षाच्या तरुणाने बंदूक आणि पेट्रोलसह ट्रम्प यांच्या निवासस्थानात घुसखोरी केली होती. परंतु सुरक्षा दलांनी त्याला रोखून वेळीच ठार केले.






