Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

America मध्ये निवृत्त झालेले लोकं पुन्हा Jobs का शोधाताहेत? जाणून घ्या ‘Unretirement’ ट्रेंडमागचं वास्तव

प्रत्येकाचं स्वप्न असतं चांगले नोकरी मग लग्न त्यानंतर संसार आणि मग रिटार्यमेंट आणि उरलेलं आयुष्य शांतपणे व्यतित करावं. पण अमेरिकेत तर याच्या उलट होताना दिसतंय. अमेरिकेत एक नवीन trend समोर येत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 01, 2026 | 09:00 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेत एक नवीन trend समोर
  • निवृत्त झालेली लोकं पुन्हा कामाच्या जगात परतताहेत
  • या तीन कारणांमुळे पुन्हा कामावर परतत आहेत?
Retired Professionals Return to Work : प्रत्येकाचं स्वप्न असतं चांगले नोकरी मग लग्न त्यानंतर संसार आणि मग रिटार्यमेंट आणि उरलेलं आयुष्य शांतपणे व्यतित करावं. पण अमेरिकेत तर याच्या उलट होताना दिसतंय. अमेरिकेत एक नवीन trend समोर येत आहे. याला “द ग्रेट अन-रिटायरमेंट” (The Great Un-Retirement) असे नाव दिले जात आहे. या ट्रेन्डनुसार, ६० ते ७० वयोगटातील अनुभवी लोकं जी यापूर्वी निवृत्त झाली होती ती पुन्हा कामाच्या जगात परतत आहेत. गोल्फ, प्रवास किंवा घरातील निवांतपणाला बाजूला करत त्यांनी पुन्हा काम शोधण्याचा मार्ग स्विकारला आहे. पण असं का होतंय?

‘फोर्ब्स’ या एका मासिकाने तर या घटनेची नोंद एक ‘धोरणात्मक नेतृत्व संधी’ म्हणजेच strategic leadership opportunity म्हणून केली आहे. त्याचप्रमाणे, ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने आपल्या अनेक अहवालांमध्ये नमूद केले आहे की, वयस्कर व्यक्ती खरोखरच पुन्हा कामावर परतत आहेत. ‘AARP’ च्या एका सर्वेक्षणानुसार जे फेब्रुवारी २०२६ मध्ये प्रकाशित करण्यात आलं त्यानुसार निवृत्त झालेल्यांपैकी ७% व्यक्तींनी गेल्या सहा महिन्यांत पुन्हा काम करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी हा आकडा ६% इतका होता. या गटातील ४८% व्यक्तींनी सांगितले की, आर्थिक गरजेपोटी ते पुन्हा कामावर परतले आहेत. पण नेमकी कोणती कारणं आहेत ज्यामुळे रिटार्य झालेली मंडळी पु्न्हा कामावर परतत आहेत.

या तीन कारणांमुळे पुन्हा कामावर परतत आहेत?

महागाई आणि वाढता खर्च

निवृत्तीवेतन आणि वैयक्तिक बचतीची रक्कम आता दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पुरेशी ठरत नाहीये. परिणामी, आपली पूर्वीची जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी काम करणे आता अत्यावश्यक बनले आहे. म्हणून हा पर्याय निवडला जाण्याची शक्यता आहे.

एकटेपणा आणि मानसिक पोकळी

दीर्घकाळ घरीच घालवल्यामुळे लोकांमध्ये कंटाळा आणि एकटेपणाची भावना निर्माण होऊ लागली आहे. कामामुळे मित्र आणि सहकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळते, तसेच मन मिळून मिसळून राहतं आणि कामात मग्न राहते. हा मुद्दा फोर्ब्सच्या अहवालात प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आला होता. त्यामुळे हे कारण विशेष करुन अधोरेखित केलं जाऊ शकतं.

कंपन्यांना असलेल्या अनुभवाची गरज

तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रातील तरुण व्यावसायिकांकडे जरी प्रचंड उत्साह असला, तरी संकटांवर मात करण्यासाठी आणि प्रभावी मार्गदर्शन किंवा mentorship करण्यासाठी आवश्यक असलेला सखोल अनुभव या अनुभवी ज्येष्ठांकडेच असतो. कंपन्या अत्यंत उत्सुकतेने आणि दोन्ही हात पसरून त्यांचे पुन्हा स्वागत करत आहेत.

कंपन्या त्यांचे पुन्हा स्वागत का करत आहेत?

आजकाल ‘Gen Z’ मधील व्यावसायिकांमध्ये वारंवार नोकऱ्या बदलण्याचा कल मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. याउलट, निवृत्त होऊन पुन्हा कामावर परतणाऱ्या व्यक्ती अधिक निष्ठावान कर्मचारी असतात. त्यांना सहसा फारशा प्रशिक्षणाची गरज भासत नाही आणि ते कामाच्या ठिकाणी शिस्त व स्थैर्य घेऊन येतात. हा प्लस पॉईंट समोर ठेवून कंपन्या देखील या लोकांना आनंदानं स्वीकारत आहेत.

भारतातील परिस्थिती काय?

भारतात, सरकारी नोकऱ्यांसाठी निवृत्तीचे सर्वसाधारण वय ५८ ते ६० वर्षे असते. अमेरिकेइतका हा कल अजून भारतात मोठ्या प्रमाणावर पसरलेला नसला, तरी या दिशेने निश्चितच बदल होण्यास सुरुवात झाली आहे. ‘गिग इकॉनॉमी’, सल्लागार भूमिका आणि मार्गदर्शनाच्या संधींच्या माध्यमातून, ५० किंवा ६० वर्षांहून अधिक वयाचे अनेक व्यक्ती आपल्या व्यावसायिक जीवनात एका ‘दुसऱ्या पर्वाचा’ प्रारंभ करताना दिसत आहेत. आगामी काळात, ‘सिल्व्हर इकॉनॉमी’ भारताच्या कॉर्पोरेट क्षेत्रातही दिसू शकते.

Web Title: Retired professionals return to work great unretirement trend usa marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • Career
  • career guide
  • Career News

संबंधित बातम्या

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
1

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी
2

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी

NCC Benefits for Students: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! NCC चे ‘हे’ सर्टिफिकेट मिळवण्याचे फायदे लगेच वाचा
3

NCC Benefits for Students: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! NCC चे ‘हे’ सर्टिफिकेट मिळवण्याचे फायदे लगेच वाचा

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
4

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.