फोटो सौजन्य- प्रतिनिधी
सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संस्थांतर्गत सह्याद्री प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक क्रीडा संग्राम सह्याद्री क्रीडा संकुल सावर्डे येथे नुकताच संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या अंगी क्रीडा नैपुण्य विकसित व्हावे व ग्रामीण भागातून दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सह्याद्री क्रीडा संग्रामात सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने वर्चस्व प्रस्थापित करून वैयक्तिक खेळासह सांघिक खेळात नेत्रदीपक कामगिरी करून पदकांची लूट केली.
वैयक्तिक स्पर्धा आणि विजेतेपद
या स्पर्धेमध्ये माध्यमिक गटामध्ये कबड्डी मुले 22 संघ कबड्डी मुली 15 खो खो मुले 9 संघ खो खो मुली 8 संघ व्हॉलीबॉल मुले 8 संघ हॉलीबॉल मुली 9 संघ समाविष्ट झाले होते. उच्च माध्यमिक गटामध्ये कबड्डी हॉलीबॉल या क्रीडा प्रकारामध्ये प्रत्येकी 4 संघ समाविष्ट झाले होते. माध्यमिक गटामध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात रोहन राठोड 1500 मीटर धावणे प्रथम,हुमेरा सय्यद 800 मीटर धावणे प्रथम,अनुजा पवार 1500 मीटर धावणे प्रथम,सुजल जोशी 800 मीटर धावणे तृतीय,सोहम जोशी उंच उडी तृतीय,मुक्ता भुवड हिने 100 मीटर धावणे तृतीय क्रमांक पटकावून यश संपादन केले.
सांघिक स्पर्धा आणि विजेतेपद
सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये कबड्डी मुले प्रथम, कबड्डी मुली प्रथम, हॉलीबॉल मुले प्रथम, हॉलीबॉल मुली तृतीय,खो खो मुली तृतीय, 4 x 100 मी रिले मुली द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.उच्च माध्यमिक गटामध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात आर्यन राणे 100 मीटर धावणे प्रथम,समृद्धी बामणे 100 मीटर व 200 मीटर धावणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये हॉलीबॉल मुले प्रथम,हॉलीबॉल मुली प्रथम,कबड्डी मुले प्रथम,कबड्डी मुली द्वितीय, 4 x 100 मी रिले मुले व मुली प्रथम क्रमांक प्राप्त करून यशाची चढती कमान कायम राखली आहे.सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक रोहित गमरे,अमृत कडगावे,प्रशांत सकपाळ, दादासाहेब पांढरे यांनी मार्गदर्शन केले.
सह्याद्री शिक्षण संस्थेचे सचिव महेश महाडिक व क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम यांच्या मार्गदर्शनाने या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. कोसबी फुरुसचे मुख्याध्यापक उदयराज कळंबे यांनी संस्थेतील सर्व क्रीडा शिक्षकांच्या साह्याने या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या.प्राविण्य प्राप्त खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखरजी निकम, अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सचिव महेश महाडिक,शालेय समितीचे चेअरमन व जेष्ठ विश्वस्त शांताराम खानविलकर,संस्थेचे पदाधिकारी, शालेय समितीचे सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर,शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.