माजी आयएएस अधिकारी अमित खरे यांची भारताचे नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खरे हे याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात जितकी प्रभावशाली होती, तितकीच पुढची वाटचालही ठळक ठरली आहे.
प्रशासकीय कारकिर्द आणि शिक्षणक्षेत्रात योगदान
अमित खरे हे १९८५ बॅचचे झारखंड केडरमधील IAS अधिकारी आहेत. ते १२ ऑक्टोबर २०२१ पासून पंतप्रधान कार्यालयात सामाजिक क्षेत्राशी संबंधित कामकाज सांभाळत होते. त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (National Education Policy – NEP) तयार करण्याच्या कोअर टीममध्ये सक्रिय भूमिका बजावली होती. शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवणाऱ्या या धोरणाचा आराखडा तयार करण्यात खरे यांचे मोठे योगदान होते.
शैक्षणिक पार्श्वभूमी पाहता, त्यांनी दिल्ली विद्यापीठातील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून भौतिकशास्त्रात B.Sc. पूर्ण केली आणि त्यानंतर IIM अहमदाबाद येथून व्यवस्थापन पदवी (MBA) घेतली.
चारा घोटाळ्याचा पर्दाफाश – खरे यांची धाडसी कारवाई
प्रशासकीय सेवेत असताना खरे यांनी त्यांच्या प्रामाणिकतेचा ठसा उमटवला. १९९५ ते १९९७ या काळात ते पश्चिम सिंहभूम (चैबासा) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. त्याच काळात त्यांनी बिहारच्या पशुसंवर्धन विभागात सुरू असलेला चारा घोटाळा उघडकीस आणला. सुमारे ९५० कोटी रुपयांचा हा घोटाळा होता, ज्यामध्ये तेव्हाचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा आणि इतर अनेक वरिष्ठ नेत्यांचा सहभाग होता.
अमित खरे यांच्या तपासामुळे या घोटाळ्याची व्याप्ती समोर आली आणि लालू यादव यांच्यावर एफआयआर दाखल करणारे पहिले IAS अधिकारी म्हणून ते प्रसिद्ध झाले. त्यांच्या कठोर आणि निष्पक्ष कारवाईमुळेच पुढे या प्रकरणात अनेक दोषींना शिक्षा झाली.
महत्त्वाच्या पदांवरील अनुभव
पत्नी निधी खरे देखील आयएएस अधिकारी
अमित खरे यांची पत्नी निधी खरे या देखील झारखंड केडरच्या 1992 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९६८ रोजी जम्मू येथे झाला. त्यांनी M.Sc. आणि M.P.A. (Master of Public Administration) पदवी घेतली आहे. सध्या त्या भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत आहेत.