Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शहा महिला महाविद्यालयात ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’; विद्यार्थिनींना शिक्षणासोबत करिअरची नवी संधी

शहा महिला महाविद्यालयात ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’ उपक्रम सुरू करण्यात आला असून विद्यार्थिनींना शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे. या उपक्रमामुळे करिअरला नवी दिशा मिळून नोकरीच्या संधी वाढण्याची अपेक्षा आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 17, 2026 | 12:10 PM
शहा महिला महाविद्यालयात ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’; विद्यार्थिनींना शिक्षणासोबत करिअरची नवी संधी

शहा महिला महाविद्यालयात ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’; विद्यार्थिनींना शिक्षणासोबत करिअरची नवी संधी

Follow Us
Follow Us:
  • शहा महिला महाविद्यालयात ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’
  • विद्यार्थिनींना शिक्षणासोबत करिअरची नवी संधी
  • उत्कृष्ट नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या
मुंबई : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित मणिबेन एम.पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयात तृतीय वर्षांतील विद्यार्थिनीना महाविद्यालयीन शिक्षणासोबतच नवीन शिक्षण प्रणाली अंतर्गत प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणाऱ्या व्यावसायिक प्रशिक्षण (ऑन द जॉब ट्रेनिंग) या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या करिअरला नवी दिशा मिळत आहे. अनेक विद्यार्थिनींनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना उत्कृष्ट नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. शैक्षणिक ज्ञानाबरोबरच कौशल्य विकासावर भर देणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थिनीच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली आहे. या व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे महाविद्यालयाने विद्यार्थिनींना शिक्षणाबरोबरच जगण्याला मोठा आधार मिळवून दिल्याने विद्यार्थिनों बरोबरच पालकांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे.

राज्यात प्राध्यापक भरतीला हिरवा कंदील; ५,०१२ पदांसाठी महिनाभरात जाहिरात अपेक्षित

उद्योगक्षेत्रात १०० तासांचे प्रशिक्षण

महाविद्यालयाच्या सर्वच विभागाच्या पुढाकारातून आणि विविध संस्थांच्या सहकार्याने ऑन द जॉब ट्रेनिग उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत विद्यार्थिनीनी विविध शाळा, कार्यालये प्रसार माध्यमे, स्वयंसेवी संस्था आणि उद्योगक्षेत्रात जाऊन १०० तासांचे प्रशिक्षण पूर्ण केले.

या प्रशिक्षणादरम्यान विद्याथ्यांना केवळ कामाची ओळखच नाही. तर जबाबदारी, वेळेचे व्यवस्थापन, संवादकौशल्य आणि समस्या सोडविण्याची क्षमता यांसारखी जीवनावश्यक कौशल्येही आत्मसात करण्याची संधी मिळाली.

एक जबाबदार नागरिक बनण्याची मिळते प्रेरणा

ओजेटी हा उपक्रम विद्यार्थिनीच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे विद्यार्थिनीना केवळ नोकरी मिळविण्यास मदत होत नाही, तर त्यांना एक जबाबदार नागरिक बनण्याची प्रेरणाही मिळते, भविष्यातही अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप
देण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी दिली.

विक्री कौशल्याचे प्रशिक्षण

या प्रशिक्षणाचा सर्वांत सकारात्मक परिणाम म्हणजे अनेक विद्यार्थिनीना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच संस्थांमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. मराठी विभागातील आठ विद्यार्थिनींनी रिटेल सेल्स असोसिएट ट्रेनिंग प्रोग्राम या प्रकल्पात ग्राहकांशी व्यावसायिक संवाद, विक्री कौशल्याचे प्रशिक्षण अंतर्गत पूर्ण करताच, त्यांना सेन्को गोल्ड अँड डायमं, कॅरेटलेन, तनिष्क, त्रिभुवनदास भिमजी झवेरी, तनिष्क सारख्या नावाजलेल्या दागिन्यांच्या दुकानात नोकरीची संधी मिळाली आहे.

पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष कामाचा अनुभव वेगळा

या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थिनीने आपल्या अनुभवांविषयी बोलताना सांगितले की, ‘पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष काम करताना मिळणारा अनुभव खूप वेगळा असतो. सुरुवातीला थोडी भीती वाटत होती, पण हळूहळू आत्मविश्वास वाढला. शिक्षक आणि संस्थेतील मार्गदर्शकांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे आम्ही काम व्यवस्थित शिकू शकलो.’

विद्यापीठ व महाविद्यालयांकडून अंगणवाडी केंद्रे दत्तक घेण्याचा मोठा निर्णय : NEP अंतर्गत UGCचे परिपत्रक जारी

Web Title: Shaha mahila college on the job training career opportunities news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • Career News
  • education

संबंधित बातम्या

Yogesh Soman Workshop: साहित्यात अनुभवांना असते अनन्यसाधारण महत्त्व; अभिनेते योगेश सोमण यांचे प्रतिपादन
1

Yogesh Soman Workshop: साहित्यात अनुभवांना असते अनन्यसाधारण महत्त्व; अभिनेते योगेश सोमण यांचे प्रतिपादन

ABVP Warning to DTE: विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष; अभाविपने तंत्रशिक्षण संचालनालयाला दिला ‘हा’ मोठा इशारा
2

ABVP Warning to DTE: विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष; अभाविपने तंत्रशिक्षण संचालनालयाला दिला ‘हा’ मोठा इशारा

Beed Inspirational Story: साडी नेसून धावली आणि जिंकली मॅरेथॉन; बीडच्या माऊलीचे सर्वत्र का होतयं कौतुक?
3

Beed Inspirational Story: साडी नेसून धावली आणि जिंकली मॅरेथॉन; बीडच्या माऊलीचे सर्वत्र का होतयं कौतुक?

CAT 2026 ची तयारी AI द्वारे कशी करावी? जाणून घ्या अभ्यासाच्या स्मार्ट ट्रिक्स!
4

CAT 2026 ची तयारी AI द्वारे कशी करावी? जाणून घ्या अभ्यासाच्या स्मार्ट ट्रिक्स!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.