Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonam Wangchuk Protest: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक मैदानात; वाचा त्यांचा शैक्षणिक प्रवास एका क्लिकवर…

Sonam Wangchuk Hunger Strike : NEET-UG २०२६ पेपर फुटीप्रकरणी सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील उपोषणाचा १९ वा दिवस. लडाखचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि इनोव्हेटर सोनम वांगचुक यांच्या जीवनप्रवासाचा सविस्तर आढावा एकदा वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 16, 2026 | 10:00 AM
sonam vangchuk

sonam vangchuk

Follow Us
Follow Us:

Sonam Wangchuk Hunger Strike: नीट-युजी २०२६ (NEET-UG 2026) पेपर फुटीच्या वादावरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असलेले सोनम वांगचुक यांचे दिल्लीतील जंतर-मंतर येथे बुधवारपासून आमरण उपोषण सुरू झाले आहे. या उपोषणाने 19 व्या दिवसात प्रवेश केला असून त्यांची प्रकृतीही खालवली आहे. याच पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक यांचा शैक्षणिक प्रवास आणि कमाईचे स्त्रोत जाणून घेऊया..

सोनम वांगचुक यांचे सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण

सोनम वांगचुक यांचा जन्म १ सप्टेंबर १९६६ रोजी लडाखमधील ‘उलेतोकपो’ या छोट्याशा गावात झाला. त्यांचे बालपण अत्यंत साधे आणि आव्हानांनी भरलेले होते. त्या काळात त्यांच्या गावात आधुनिक सुविधा नव्हत्या, ज्यामुळे वयाच्या ९ व्या वर्षांपर्यंत त्यांना शिक्षण घेता आले नव्हते. त्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी श्रीनगरला पाठवण्यात आले. मात्र, तिथेही त्यांना अभ्यासात अनेक अडचणी आल्या, कारण त्यांना हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषा समजण्यात अडचण येत होती. या सर्व अडचणींवर मात करत त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले. पुढे त्यांनी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (NIT) श्रीनगरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली. विशेष म्हणजे, सोनम वांगचुक आपल्या शिक्षणाचा खर्च लहान मुलांना शिकवणी (ट्यूशन) देऊन भागवत असत.

लडाखमधील शिक्षण सुधारणा आणि नवनिर्मिती

वर्ष १९८८ मध्ये सोनम वांगचुक यांनी ‘स्टुडंट एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख’ (SECMOL) ची स्थापना केली. स्थानिक मुलांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत आणि संस्कृतीनुसार शिक्षण देणे, हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. त्यानंतर त्यांनी ‘हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज लडाख’ (HIAL) ची स्थापना केली, जे आज पर्यायी शिक्षण आणि संशोधनाचे एक मोठे केंद्र मानले जाते. त्यांच्या इनोव्हेशनचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे ‘आइस स्तूप’ तंत्रज्ञान, म्हणजेच कृत्रिम हिमनदी हे होते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने लडाखमधील पाण्याच्या समस्येवर मोठ्या प्रमाणावर तोडगा काढण्यात आला. या कामगिरीमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठी ओळख मिळाली.

School Admission Scam: नवोदय-सैनिक स्कूल प्रवेश प्रक्रियेत मोठा घोळ? ‘या’ एका चुकीमुळे विद्यार्थी चौकशीच्या भोवऱ्यात सापडले

सोनम वांगचुक यांच्या कमाईचे मार्ग

विविध रिपोर्टनुसार, सोनम वांगचुक यांची एकूण संपत्ती (नेटवर्थ) सुमारे ७५ लाख रुपये आहे. असे सांगितले जाते की, त्यांच्याकडे कोणताही आलिशान बंगला किंवा महागड्या गाड्या नाहीत. वांगचुक यांच्या कमाईचा बहुतांश हिस्सा हा शिक्षण सुधारणा, पर्यावरण प्रकल्प आणि समाजसेवेवर खर्च होतो. त्यांच्या कमाईचे प्रमुख मार्ग खालीलप्रमाणे आहेत:

युट्यूब चॅनल : सोनम वांगचुक यांचे ‘वांगचुक वर्ल्ड’ (Wangchuk World) हे युट्यूब चॅनेल अत्यंत लोकप्रिय आहे. या चॅनेलवर १७ लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. त्यांच्या कमाईचा एक मोठा भाग यातून येतो. युट्यूबवरून ते दरमहा साधारण ३ ते ५ लाख रुपयांची कमाई करतात.

व्याख्याने आणि परिषदा: ते जागतिक व्यासपीठांवर भाषणांमधून, लेक्चर्समधून आणि कॉन्फरन्सेसच्या माध्यमातून मानधन मिळवतात.

प्रकल्प आणि सल्लागार शुल्क: भारतीय सेना आणि इतर संस्थांसोबत काम करताना सोलर प्रोजेक्ट्स आणि पर्यावरणपूरक कामांसाठी त्यांना व्यावसायिक शुल्क मिळते.

Ram Mandir CEO Recruitment: अयोध्या राम मंदिराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी भरती! केवळ ‘या’ उमेदवारांना मिळणार प्राधान्य

‘३ इडियट्स’ चित्रपटाशी असलेले कनेक्शन

बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट ‘३ इडियट्स’ मधील ‘फुंसुख वांगडू’ हे पात्र सोनम वांगचुक यांच्याच जीवनावर प्रेरित असल्याचे मानले जाते. चित्रपटात ज्याप्रमाणे एक शास्त्रज्ञ शिक्षण आणि इनोव्हेशनच्या जोडीने एका नव्या दृष्टिकोनातून पुढे जातो, तेच काम सोनम वांगचुक खऱ्या आयुष्यात करत आहेत. याच कारणामुळे ते आजच्या तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत.

Web Title: Sonam wangchuk hunger strike jantar mantar neet ug row net worth education

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • NEET
  • Protest
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Court Staff Protest : समान वेतानासह कामासाठी न्यायालयीन कर्मचार्‍यांचे आंदोलन; आंदोलनाचा दुसरा टप्पा १६ व १७ ऑक्टोंबरपासून सुरू
1

Court Staff Protest : समान वेतानासह कामासाठी न्यायालयीन कर्मचार्‍यांचे आंदोलन; आंदोलनाचा दुसरा टप्पा १६ व १७ ऑक्टोंबरपासून सुरू

Pakistan Violence : गव्हर्नर राजवटीवरून पाकिस्तानमध्ये संघर्ष; पोलिसांच्या गोळीबारात पाच जण जखमी
2

Pakistan Violence : गव्हर्नर राजवटीवरून पाकिस्तानमध्ये संघर्ष; पोलिसांच्या गोळीबारात पाच जण जखमी

Nobel Prize: नोबेल शांतता पुरस्काराचे सर्वात तरुण मानकरी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर; वाचा त्यांच्या संघर्षाची रंजक गोष्ट
3

Nobel Prize: नोबेल शांतता पुरस्काराचे सर्वात तरुण मानकरी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर; वाचा त्यांच्या संघर्षाची रंजक गोष्ट

Buldhana: लेखी आश्वासनाने ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण मागे; आमदारांच्या हस्ते घेतले लिंबूपाणी, ५ रस्त्यांचे भाग्य मार्चपर्यंत उजळणार
4

Buldhana: लेखी आश्वासनाने ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण मागे; आमदारांच्या हस्ते घेतले लिंबूपाणी, ५ रस्त्यांचे भाग्य मार्चपर्यंत उजळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.