Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Professional: मूनलायटिंगमुळे चर्चेत आला आयटी प्रोफेशनल रोहित; ८० लाखांची बचत असूनही भविष्य़ाची चिंता का करतोय?

Tech Professional Rohit Moonlighting: मूनलायटिंग नोकरीमुळे चर्चेत आलेल्या २९ वर्षीय आयटी प्रोफेशनल रोहितची कहाणी. ८० लाखांची बचत आणि ७ लाखांचे मासिक उत्पन्न असूनही तो का आहे आर्थिक चिंतेत? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 18, 2026 | 10:22 AM
tech

tech

Follow Us
Follow Us:

Tech Professional Rohit Moonlighting: अलीकडच्या काळात २९ वर्षीय आयटी प्रोफेशनल (IT Professional) रोहित आपल्या ‘मूनलायटिंग’ नोकरीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. हे प्रकरण ‘फिक्स युअर फायनान्स’ या एका पर्सनल फायनान्स पॉडकास्टवरून समोर आले. यामध्ये रोहितने स्वतः आयटी कर्मचारी असल्याचे सांगितले. यानंतर सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये रोहित आणि त्याच्या कामाची जोरदार चर्चा सुरू झाली.

रोहित हा एक भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. शो दरम्यान रोहितने सांगितले की, तो दिवसा एका भारतीय कंपनीत आणि रात्री एका अमेरिकन कंपनीत काम करतो. या दोन्ही नोकऱ्यांमधून त्याचे मासिक उत्पन्न सुमारे ७ लाख रुपये असल्याचे सांगितले गेले आहे. त्याचे वार्षिक सॅलरी पॅकेज ८४ लाख रुपये आहे. तो दररोज सुमारे १६ तास काम करतो. त्याच्याकडे दोन घरे, एक कार आणि सुमारे ८० ते ८२ लाख रुपयांची बचत आहे.

एकाच वेळी करतोय दोन नोकऱ्या

रोहितला भीती आहे की, भविष्यात एआयमुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. तसेच लहानपणाच्या आर्थिक अडचणींमुळे तो मानसिक स्तरावर आर्थिक असुरक्षितता अनुभवतो. याच कारणामुळे तो सलग दोन नोकऱ्या करत आहे, यामुळे त्याच्यावर मानसिक आणि शारीरिक ताण खूप वाढला आहे.

रोहितला शिकवण्यासाठी भावाने सोडले शिक्षण

तसेच रोहित पुढे सांगतो की, त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती एकाच वेळी दोन मुलांना शिकवण्यासारखी नव्हती. त्यामुळे रोहितला शिकता यावे म्हणून त्याच्या मोठ्या भावाने स्वतःचे शिक्षण सोडले. रोहितला असे वाटते की, जर तो आता कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकला नाही, तर ती त्याच्या कुटुंबाची हार असेल.

८० लाखांची बचत असूनही चिंताग्रस्त

रोहितने सांगितले की, त्याच्याकडे ८० लाख रुपयांची बचत आहे. त्याने ८४ लाख रुपयांचे घर घेतले आहे आणि वडील झाल्यानंतर एक कार खरेदी केली आहे. या दोन्ही गोष्टींसाठी दरमहा मोठी ईएमआय (EMI) जाते. या महागाईच्या काळात ८० लाखांची बचत पाठीशी असूनही रोहित आपल्या आर्थिक सुरक्षिततेबाबत चिंतेत आहे.

Senior Citizen Reservation: वयाच्या ७० व्या वर्षी ‘नीट’ परीक्षा; पेपर लीकचा धक्का पचवून अशोक बहरा का पोहचले हायकोर्टात?

७ ते ८ कोटींच्या बचतीनंतर एक नोकरी सोडणार

जेव्हा पॉडकास्टचे सूत्रसंचालक शर्मा यांनी रोहितला विचारले की, ‘काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये चांगला ताळमेळ राखण्यासाठी तू तुझी एक नोकरी सोडण्याचा विचार करशील का?’ त्यावर रोहितने सांगितले की, त्याने हा निर्णय घेण्यापूर्वी एक आर्थिक ध्येय निश्चित केले आहे.

रोहित म्हणाला, “येत्या ५ ते ६ वर्षांत मला ७ किंवा ८ कोटी रुपये वाचवायचे आहेत. त्यानंतर मी भारतातील नोकरी सोडून देईन आणि केवळ अमेरिकेची नोकरी सुरू ठेवेन.”

मूनलायटिंग (Moonlighting) म्हणजे काय?

एकाच वेळी एकापेक्षा जास्त नोकऱ्या करणे म्हणजे ‘मूनलायटिंग’ होय. हे एक प्रकारचे पार्ट-टाइम जॉब किंवा फ्रीलान्सिंग काम असते, कारण हे काम लॅपटॉप आणि इंटरनेटच्या माध्यमातून घरातून करणे शक्य असते.

NEET UG Result: ६३ हजार सरकारी जागांसाठी चुरस! जाणून घ्या कमी रँकवरही मेडिकल प्रवेश मिळवून देणारी ‘ही’ कॉलेजेस

भारतातील मूनलायटिंगचे नियम

भारतात मूनलायटिंगबाबत कोणताही राष्ट्रीय कायदा नाही. याची परवानगी प्रामुख्याने रोजगार करार, कंपनीचे एचआर (HR) धोरण आणि लागू असलेल्या कामगार कायद्यांवर अवलंबून असते. जर कोणताही कर्मचारी कंपनीच्या परवानगीशिवाय प्रतिस्पर्धी कंपनीसाठी काम करत असेल किंवा गोपनीय माहिती शेअर करत असेल, तर तो कराराचा भंग मानला जाऊ शकतो. मूनलायटिंगची पद्धत अनेक दशकांपासून अस्तित्वात आहे, परंतु कोविड-१९ नंतर (२०२० पासून) आणि विशेषतः २०२२ पासून भारताच्या आयटी क्षेत्रात हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे. मूनलायटिंगचा मुख्य उद्देश अतिरिक्त उत्पन्न मिळवणे, नवीन कौशल्ये शिकणे किंवा अनुभव घेणे हा असतो.

Web Title: Tech professional rohit moonlighting case dual employment salary saving rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • AI technology
  • Career
  • hard work
  • Tech News

संबंधित बातम्या

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव
1

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!
2

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!

WhatsApp Update: आता व्हॉट्सॲपवरूनच भरा पाणी आणि क्रेडिट कार्डच बिल… भारतीय यूजर्ससाठी आलं नवं फीचर, असा करा वापर
3

WhatsApp Update: आता व्हॉट्सॲपवरूनच भरा पाणी आणि क्रेडिट कार्डच बिल… भारतीय यूजर्ससाठी आलं नवं फीचर, असा करा वापर

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत
4

I Phone 16 Price Drop: नवा iPhone येण्याआधी मोठी ऑफर! iPhone 16 वर थेट 15,000 पर्यंत बचत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.