फोटो सौजन्य - Social Media
आजकाल व्यक्ती कशावरही टेन्शन घेण्यास सुरुवात करतोय. पण यामध्ये मानसिक तणावाची सर्वात सामान्य गोष्ट म्हणजे व्यक्तीचे वेतन. महागाई वाढत आहे आणि या वाढत्या महागाईत लोकांना पैशांची गरज वाढत आहे. पण हे पैसे आणणार कुठून? त्यासाठी लोक इतरांची चाकरी करतात. नोकऱ्या करतात. अशा वेळी, कामाच्या ठिकाणी जीव तोडून काम केल्याने देखील मोबदला कमी मिळतो. अशा वेळी वेतनाच्या रक्कमेत असणारे शून्य मोजता कपाळावर आट्या येतात आणि मानसिक तणावाला सुरुवात होते.
कमी पगार असलेल्या लोकांमध्ये मानसिक तणावाच्या समस्या फार आढळून येतात. कमी पगारामुळे तनाव, चिंता, डिप्रेशन, बर्नआउटची समस्या वाढत चालली आहे. कमी पगारात कुटुंबाच्या प्रत्येक गरज भागवणे कठीण होऊन जाते. कधी कधी तर कमी पगारामुळे एका व्यक्तीला अनेक ठिकाणी कामे करावे लागते. ज्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्याला इजा होते.
फ्यूचर फोरमच्या संशोधनानुसार, 2021 नंतर कार्यस्थळी बर्नआउटची पातळी विक्रमी उंचीवर पोहोचली आहे. अमेरिका, ब्रिटनसह 6 देशांतील 10,000 पूर्णवेळ कर्मचार्यांपैकी 40% हून अधिक जणांनी बर्नआउटची समस्या असल्याचे मान्य केले आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) याला मानसिक थकवा, ऊर्जा कमी होणे आणि नकारात्मकता यांसारख्या लक्षणांशी जोडते. 2021 मध्ये ही समस्या 38% होती, जी आता 42% वर पोहोचली आहे. ही समस्या कर्मचारी कार्यक्षमता आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते.
कामाच्या ठिकाणी ताणामुळे कामावर परिणाम
जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि आंतरराष्ट्रीय श्रम संघटना यांच्या अहवालानुसार, कर्मचाऱ्यांच्या ताणामुळे वार्षिक कामाचे अनेक तास वाया जात आहेत, ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला दरवर्षी 1 ट्रिलियन डॉलर्सचा तोटा होत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला होणार हा तोटा वाढत चालला आहे. वित्त क्षेत्रात ही समस्या अधिक दिसून येते. एका संशोधनात समोर आले आहे कि भारतासह 10 देशांतील 78% कर्मचारी त्यांच्या नोकरीत प्रगती होत नसल्याची भावना व्यक्त करतात.
कमी पगाराचा प्रभाव
कमी पगार, सोशल मीडियावर अधिक वेळ घालवणे, आणि प्रमोशन न मिळणे यामुळे वाढत चाललं आहे. याचा उपाय तर एकच आहे कि कर्मचाऱ्यांनी स्क्रीन टाइम कमी करावे. स्वतःच्या विकासावर लक्ष द्यावे. स्वतःचे शारीरिक आणि सामाजिक विकास या दोन्ही पैलूंना जपता मानसिक विकास आरामात होईल. मुळात, कमी पगारामुळे महिलांमध्ये होणारा मानसिक त्रास पुरुषांपेक्षा जास्त असल्याचे रिपोर्टमध्ये आढळून आले आहे.