Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन अभ्यासक्रमासाठी ‘सेतू’ची अमलबजावणी; राष्ट्रीय धोरणानुसार होणार टप्प्याटप्प्याने सुरुवात

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात नवीन अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू असून, विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमाशी सुसंगतपणे जुळवून घेता यावे यासाठी यंदा शाळा सुरू होताच सेतू अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 13, 2026 | 01:20 PM
नवीन अभ्यासक्रमासाठी 'सेतू'ची अमलबजावणी; राष्ट्रीय धोरणानुसार होणार टप्प्याटप्प्याने सुरुवात

नवीन अभ्यासक्रमासाठी 'सेतू'ची अमलबजावणी; राष्ट्रीय धोरणानुसार होणार टप्प्याटप्प्याने सुरुवात

Follow Us
Follow Us:

पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात नवीन अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू असून, विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमाशी सुसंगतपणे जुळवून घेता यावे यासाठी यंदा शाळा सुरू होताच सेतू अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. इयत्ता तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा सेतू अभ्यासक्रम लागू करण्यात आला असून, तो पूर्ण झाल्यानंतर नियमित अध्यापनाला सुरुवात केली जाणार आहे.

 

राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. यापैकी तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नवीन अभ्यासक्रमातील संकल्पना, क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती यांची जुन्या अभ्यासक्रमाशी सांगड घालण्यासाठी हा सेतू अभ्यास तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम परिषदेच्या संकेतस्थळावर ‘www.maa.ac.in’पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला असून तो सर्वांसाठी खुला आहे.

‘‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अपेक्षित केलेल्या ध्येयांची परिपूर्ती करण्याच्या दृष्टीने हा सेतू अभ्यास तयार केला आहे. शालेय शिक्षण अभ्यासक्रम २०२६ मधील ध्येये, क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती साध्य करण्याच्या हेतूने हा अभ्यास महत्त्वाचा ठरेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा अभ्यास उपयुक्त ठरणार आहे.’’ – डॉ. हेमंत वसेकर, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी)

हे सुद्धा वाचा : आता वाचलीस, पण पुन्हा दिसलीस तर…; पुण्यात महिलेला कारने उडवून जीवे मारण्याचा प्रयत्न

सेतू अभ्यासक्रमाची रचना

  • अभ्यासक्रमासाठी २१ दिवसांचा कालावधी आहे
  • क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे
  • विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाची व्याप्ती अभ्यासात अधोरेखित केली
  • विद्यार्थ्यांचे ज्ञान, आकलन आणि कौशल्याचा विकास साधणार
  • सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर अध्यापन सुरू होणार.
हे सुद्धा वाचा : भरधाव ट्रक थेट लॉजमध्ये घुसला, एकाचा मृत्यू तर एक जखमी; धुळे-सोलापूर हायवेवर भीषण अपघात

शिक्षक प्रशिक्षण पुन्हा मार्गी

शिक्षकांना देण्यात आलेल्या जनगणनेच्या कामांमुळे पुढे ढकलावे लागलेल्या शिक्षक प्रशिक्षणाचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून, १० जुलैपर्यंत तालुका स्तरापर्यंतचे पूर्ण करण्यात येणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी प्रशिक्षण वेळापत्रकासह सूचनांचे परिपत्रक प्रसिद्ध केले.

Web Title: The new curriculum is being implemented in the state in a phased manner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • maharashtra
  • Student
  • Students

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांचा मित्र मृग किडा नामशेष होण्याच्या मार्गावर; रासायनिक शेतीमुळे अस्तित्व धोक्यात
1

शेतकऱ्यांचा मित्र मृग किडा नामशेष होण्याच्या मार्गावर; रासायनिक शेतीमुळे अस्तित्व धोक्यात

स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न हाणून पाडला; कणकवलीत कंपनीचे अधिकारी अन् ग्राहकांमध्ये बाचाबाची
2

स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न हाणून पाडला; कणकवलीत कंपनीचे अधिकारी अन् ग्राहकांमध्ये बाचाबाची

Teacher Training : जनगणनेमुळे रखडलेले शिक्षक प्रशिक्षण पुन्हा मार्गी; ‘या’ तारखेपर्यंत पूर्ण होणार
3

Teacher Training : जनगणनेमुळे रखडलेले शिक्षक प्रशिक्षण पुन्हा मार्गी; ‘या’ तारखेपर्यंत पूर्ण होणार

दौंडच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस; बळीराजा सुखवला! खरीप हंगामातील शेती कामांना वेग
4

दौंडच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस; बळीराजा सुखवला! खरीप हंगामातील शेती कामांना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.