फोटो सौजन्य- सोशल मीडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी परीक्षेसंबंधी चर्चा करणारा संवादात्मक कार्यक्रम हा जानेवारी २०२५ रोजी नवी दिल्लीमधील भारत मंडपम येथे टाउन हॉल स्वरूपात आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) परीक्षा पे चर्चा च्या 8 व्या आवृत्तीबाबत एक सूचना जारी केली आहे. ही अधिकृत सूचना सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर उपलब्ध आहे.
कार्यक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी नोंदणी innovateindia1.mygov.in या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली आहे. या कार्यक्रमामध्ये, पंतप्रधान मोदी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतील, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांची सर्व स्वप्ने आणि ध्येये साध्य करण्यासाठी मदत करता येणार आङे. सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ताणाचे व्यवस्थापनाकरिता मदत म्हणून हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो.
परीक्षा पे चर्चाकरिता असा करा अर्ज
“परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमामध्ये सहभागींची निवड करण्यासाठी , https://innovateindia1.mygov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्न (MCQ) स्पर्धा आयोजित केली गेली आहे. शिक्षक आणि पालकांसह इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतचे विद्यार्थी 14 जानेवारी 2025 पर्यंत स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंबंधी माहिती दिली होती.
परीक्षा का season यानी तनाव का season! #PPC2025 के साथ परीक्षा के तनाव और डर को पीछे छोड़ने का समय आ गया है। तो फिर इंतजार किस बात का? पीएम @narendramodi सर के साथ अपने अंदर के #ExamWarrior को ignite करिए। प्रधानमंत्री मोदी जी के मास्टर-क्लास का हिस्सा बनने के लिए उन्हें अपने… pic.twitter.com/OMdY2mrnJl — Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) December 17, 2024
परीक्षा पे चर्चा कार्यक्रम
परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील घेतला जाणार शिक्षण क्षेत्रातील महत्वाचा वार्षिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये, पंतप्रधान परीक्षा आणि शिक्षणाशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधतात. या कार्यक्रमाचा उद्दिष्ट हा परीक्षेचा ताण कमी करणे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि शिक्षण आणि वैयक्तिक विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे आहे. जे विद्यार्थी,शिक्षक आणि पालक या कार्यक्रमात सहभागी होतात त्यांना पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली जाते. 2018 पासून परीक्षा पे चर्चा हा उपक्रम सुरु झाला आहे. 16 फेब्रुवारी 2018 रोजी पहिल्यांदा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम पार पडला होता.






