फोटो सौजन्य - Social Media
मॅनेजमेंटमध्ये करिअर करू पाहणारे विद्यार्थी इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ पाहतात. यासाठी त्यांना कॉमन ऍडमिशन टेस्ट (CAT)ची तयारी करावी लागते. या परीक्षेत फक्त पास होणे महत्वाचे नाही तर चांगल्या रँकने पास होणे जास्त महत्वाचे असते. परीक्षा पास करून सुद्धा चांगली रँक न मिळाल्याने अनेक जण IIM मध्ये प्रवेश घेण्यापासून वंचित राहतात. परंतु, भारतात IIM सारखेच एक मॅनेजमेंट इस्न्टिट्यूट आहे. ज्यामध्ये प्रवेश घेऊन, विद्यार्थी २० लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न देण्याऱ्या ठिकाणी नोकरी करू शकतात. विशेष म्हणजे ते मॅनेजमेंट इन्स्टिटयूट स्वतः मुलांना प्लेसमेंट्स देते.
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ फॉरेस्ट मैनेजमेंट म्हणजेच IIFM मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे स्थित आहे. या इन्स्टिटयूटची स्थापना १९८२ साली भारत सरकारद्वारा केली गेली आहे. इन्स्टिटयूट पर्यावरणा निगडित ट्रेनिंग, संशोधन तसेच पूर्ण शिक्षण प्रदान करते. जसे IIM मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी CAT परीक्षा चांगल्या रँकने उत्तीर्ण करावी लागते. तसे IIFM मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी CAT/ XAT/ MAT/ MAT (FEB)/ CMAT / GMAT पैकी कोणत्याही परीक्षेत उमेदवार उत्तीर्ण असावा लागतो.
IIFM च्या निवड प्रक्रियेत CAT/ XAT/ MAT/ MAT (FEB)/ CMAT / GMAT परीक्षेतील गुणांवर लक्ष दिले जाते. निवड झालेल्या उमेदवारास मुलाखतीसाठी बोलावले जाते. या मुलाखती अहमदाबाद, भोपाल, दिल्ली, गुवाहाटी, चेन्नई, बेंगलुरु आणि कोलकत्ता या शहरात आयोजित केल्या जातात. IIFM मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नाफेड, बिर्ला एस्टेट्स, रॅम्बोल, रिन्यू पॉवर,JK पेपर लिमिटेड, सेंटर फॉर इंटरनॅशनल फॉरेस्ट रिसर्च, फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक,झायडेक्स ग्रुप्स, IDFC बँक सारख्या मोठ्या कंपनींमध्ये प्लेसमेंट दिल्या जातात.