फोटो सौजन्य - Social Media
९ ऑक्टोबर २०२४ रोजी टाटा संस्थानाचे मालक रतन टाटा यांचे निधन झाले. या बातमीने फक्त टाटा समूहच नव्हे तर संपूर्ण भारत देशभरात शोककळा पसरली आहे. जगभरातून अनेक दिग्गजांकडून बिझनेस टायकून रतनजी टाटा यांना आदरांजली वाहिली गेली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी टाटा संस्थनांकडून एका भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. या संबंधित अधिकृत अधिसूचनाही जाहीर करण्यात आली होती. अनेक उमेदवारांनी या भरतीला लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. या भरतीमध्ये विविध पदांचा विचार केला जाणार आहे.
हे देखील वाचा : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील ४६ हजार विद्यार्थ्यांना मिळणार विद्यावेतनाचा पहिला हप्ता- मंत्री मंगल प्रभात लोढा
टाटा संस्थानाच्या या भरतीच्या प्रक्रियेमध्ये वैज्ञानिक अधिकारी (C)च्या पदासाठी ०१ जागा शिल्लक आहे. वैज्ञानिक अधिकारी (बी) च्या पदासाठीही ०१ जागा शिल्लक आहे. ग्रुप B मधील प्रशासकीय सहाय्यकच्या पदासाठी ०१ जागा तर ट्रेड्समन ट्रेनी वेल्डरच्या पदासाठीही ०१ जागाच शिल्लक आहे. तर पर्यवेक्षक (कॅन्टीन), लिपिकाचा पदासाठी प्रत्येकी ०२ जागा शिल्लक आहेत. तीन रिक्त पदासाठी प्रकल्प वैज्ञानिक अधिकार्याची निवड केली जाणार आहे. कार्य सहाय्यकाच्या पदासाठी ०६ तर ट्रेड्समन ट्रेनी फिटरच्या पदासाठी एका उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.
जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर लवकरच या अर्जाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात करा. २८ वर्षे ते ४३ वर्षे वय असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. नियमांनुसार, आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना काही प्रमाणात सूट देण्यात येईल. या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरण्यासाठी उमेदवारांना काही अटी शर्तीना पात्र करणे अनिवार्य आहे. या अटी शैक्षणिक आहेत. अर्ज करण्यास पात्र उमेदवार ITI/ 12 वी/ ग्रॅज्युएशन/ BE/ B.Tech/ मास्टर्स इन कॉम्प्युटर सायन्स, IT, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवीधर हवा. शैक्षणिक अटी तसेच या भरतीविषयी सखोल माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
हे देखील वाचा : आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स आणि सायन्स फेस्ट ‘मेकॅथलॉन 2024’चे मुंबईत आयोजन, आज पासून नोंदणीप्रक्रिया सुरु
नियुक्त झालेल्या उमेदवाराला त्याच्या पदाच्या अनुसार वेतनमान दिला जाईल. अनुभव आणि पदाच्या अनुषंगाने उमेदवाराला १८,५०० ते १,१०,०९७ दरमाह वेतनमान दिला जाईल. महत्वाची बाब अशी आहे कि, उमेदवाराला ऑनलाईन अर्ज केल्यावर त्या अर्जाच्या फॉर्मची हार्ड कॉपी ‘एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर, रिक्रूटमेंट सेल, टाटा इंस्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1, होमी भाभी रोड, नेवी नगर, कुलाबा, मुंबई ४००००५’ सबमिट करावी लागणार आहे.






