फोटो सौजन्य- युट्यूब
मुंबईत भारतातील सर्वात मोठ्या रोबोटिक्स आणि विज्ञान स्पर्धा मेकॅथलॉन 2024 चे आयोजन केले जाणार आहे. मेकॅथलॉन 2024 चे आयोजन हे 19 आणि 20 ऑक्टोबर 2024 रोजी केले जाणार आहे. या मुंबई आवृत्तीमध्ये सहभागी होण्याकरिता नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी तात्काळ नोंदणी करु शकतात. कॉमनवेल्थ युथ कौन्सिल, कॉमनवेल्थ स्टुडंट असोसिएशन आणि ग्लोबल अंडरस्टँडिंग फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (GUSD) यांच्या सहकार्याने हा STEM फेस्ट मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी आणला आहे. मेकॅथलॉन 2024 हा विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव असणार आहे. ज्यामध्ये STEM प्रकल्प, इकोइनोव्हा सायन्स एक्झिबिशन, ब्रेनिएक बॅटल क्विझ यासारख्या स्पर्धा आणि रेसर रोबो, फास्टेस्ट लाइन फॉलोअर आणि अडथळे अव्हायडर सह अत्याधुनिक रोबोटिक्स आव्हाने असणार आहेत.
विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा एक उपक्रम
मेकॅथलॉन हा भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि STEM प्रकल्पांद्वारे वास्तविक-जगातील समस्या सोडवण्यासाठी तांत्रिक आणि जीवन कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा एक उपक्रम आहे. विद्यार्थ्यांमध्ये STEM – विज्ञान आणि रोबोटिक्सबद्दलची त्यांची आवड निर्माण करण्याची, मौल्यवान कौशल्ये विकसित करण्याची आणि तरुण नवकल्पकांच्या जागतिक समुदायाशी कनेक्ट होण्याची ही एक संधी आहे. विद्यार्थी त्यांचे स्थान सुरक्षित करण्यासाठी आणि भारतातील सर्वात मोठ्या STEM फेस्टचा भाग होण्यासाठी आता नोंदणी करू शकतात
नावीन्य, सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करून, मेकॅथलॉन 2024 ही विद्यार्थी, शिक्षक आणि STEM उत्साही यांच्यासाठी एक अविस्मरणीय संधी आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रतीक्षा न करता आजच नोंदणी करु शकता आणि STEM फेस्टमध्ये सहभागी होण्याचा आनंद घेऊ शकतात.
हे देखील वाचा- इसरोमध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात; ‘या’ पदांसाठी करता येईल अर्ज
मेकॅथलॉन 2024 मध्ये सहभागी होण्याकरिता खालील क्रमांकांवर संपर्क साधा
जयश्री कुमार – 97692 86661 इमेल आयडी- jayshree.kumar@orchids.edu.in
इशा पाटील- 8862032080 इमेल आयडी- Easha.patil@orchids.edu.in
सुनील महाडिक- 9930308524 इमेल आयडी- sunil.mahadik@mslgroup.com
विद्यार्थी स्पर्धेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील
वेबसाईट : www.mekathlon.com
इंस्टाग्राम : https://www.instagram.com/mekathlon_india/?igsh=eG1rNG0weW9oZzlx
युट्यूब : https://www.youtube.com/@mekathlonindia






