लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. लग्नात रॉयल आणि मॉर्डन लुक दिसावा म्हणून अनेक वेगवेगळ्या ब्रँडच्या साड्या, लेहेंगे, सिल्क साडी खरेदी केल्या जातात. साड्यांची खरेदी केल्यानंतर त्यावर नेमका कसा लुक करावा, बऱ्याचदा हे सुचत नाही. नवरीच्या साड्यांची खरेदी लग्नाच्या दोन ते तीन महिने आधीपासूनच केली जाते. पण लग्न सोहळ्यात नवरीसोबत करवलीला सुद्धा खूप जास्त मान असतो. त्यामुळे करवलीने लग्नात कायमच साडी नेसण्यापेक्षा साऊथ इंडियन हाफ साडी नेसल्यास लुक खूप सुंदर दिसेल. चला तर पाहुयात साऊथ इंडियन हाफ साडीचे काही सुंदर प्रकार.(फोटो सौजन्य – pinterest)
लग्नात करवलीसाठी दक्षिण भारतीय हाफ साडीचे सुंदर प्रकार! मनमोहक लुकचे सगळेच करतील कौतुक

तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यासारख्या दक्षिण भारतीय राज्यांमध्ये हाफ साडी प्रामुख्याने नेसली जाते. तसेच वेगवेगळ्या राज्यांमध्ये हाफ साडीला विविध नावाने ओळखले जाते.

मोठे काठ असलेले लेहेंगा किंवा साडी कोणत्याही कार्यक्रमात शोभून दिसते. हाफ साडीवर डिझाईन ब्लाऊज आणि कांजीवरम सिल्क साडीचा लेहेंगा घातल्यास लग्नात तुमचा लुक मॉर्डन आणि पारंपरिक दिसेल.

लग्न सोहळ्यात करवलीला हेवी लुक करायचा असेल तर तुम्ही सिल्क फॅब्रिकमधील लेहेंग्याची निवड करू शकता. या डिझाईनचे लेहेंगे कोणत्याही कार्यक्रमासाठी उत्तम आहे.

हळदी लुकसाठी तुम्ही या पद्धतीच्या साध्या घागऱ्यांची निवड करू शकता. बारीक बारीक निऱ्या काढून नेसवलेली हाफ साडी स्टायलिश लुक देते.

अनेकांना साडीचा पदर मोकळा ठेवायला खूप जास्त आवडतो. त्याप्रमाणेच तुम्ही लेहेंग्यावरील पदर सुद्धा मोकळा ठेवू शकता. यामुळे चारचौघांमध्ये युनिक आणि उठावदार दिसाल.






