झिम्बाब्वेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय(फोटो-सोशल मीडिया)
ZIM vs OMA, ICC T20 World Cup 2026 : आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज कोलंबो सिंहली स्पोर्ट्स क्लब स्टेडीयमवर झिम्बाब्वे आणि ओमान आमनेसामने आले आहेत. या सामन्यात झिम्बाब्वे संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर ओमान संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. झिम्बाब्वे संघ आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील पहिल्यास आमण्यात चांगली कामगिरी करून विजयी सलामी देण्याच्या प्रयत्नात असणार आहे, तर ओमान संघ देखील या सामन्यात विजय मिळवून आपला सुरवात खास करण्याच्या विचारत असणार आहे.
झिम्बाब्वेने टॉस जिंकल्यावर संघाचा कर्णधार सिकंदर रझा म्हणाला की “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. आम्ही खेळपट्टी पाहिली आणि असे दिसले की सुरुवातीला चेंडूला हालचाल मिळत आहे, आणि वाराही वाहत असल्यामुळे, माझ्या अंदाजानुसार खेळपट्टी आणखी चांगली होईल. आमच्या वेगवान गोलंदाजांना चेंडूवर नियंत्रण मिळवण्याची सर्वोत्तम संधी द्यायची आहे. किती धावांचा पाठलाग करायला आवडेल? या प्रश्नावर रझा म्हणाला की, “प्रतिस्पर्धी संघाने सांगितलेल्या धावसंख्येपेक्षा नक्कीच एक धाव जास्त, पण त्यांना खूप कमी धावसंख्येवर रोखण्याचा आणि सुरुवातीलाच चांगली फलंदाजी करून नंतर पुढे खेळण्याचा आमचा विचार आहे. आमचा विचार खूप चांगली गोलंदाजी करण्याचा आहे जेणेकरून आमच्या फलंदाजांना जास्त काही करावे लागणार नाही. पण असे असले तरी, धावसंख्या काहीही असो, एक धाव जास्त पुरेशी आहे. आमच्याकडे तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे आमच्या संघात मी आणि वेलिंग्टन आहोत आणि आमच्याकडे ब्रॅड, ब्लेसिंग मुझारबानी आणि नगारवा आहेत.”
टॉस गमावणारा ओमानचा कर्णधार जतिंदर सिंगने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “ही एक चांगली खेळपट्टी आहे, आणि दुसऱ्या डावात ती निश्चितपणे थोडी स्थिरावली. तयारी उत्कृष्ट झाली आहे.(आयसीसी टी२० विश्वचषक २०२६) आम्ही श्रीलंकेत खूप लवकर पोहोचलो आणि आमची तयारी खूप चांगली झाली. आम्ही काही सामने खेळलो, आणि येथील परिस्थिती खूप वेगळी असल्यामुळे, आम्हाला तिच्याशी जुळवून घेणे महत्त्वाचे होते. ओमानच्या तुलनेत येथे आर्द्रताही खूप जास्त आहे, त्यामुळे एकूणच तयारी अगदी अचूक झाली आहे. खेळपट्टीनुसार, मला वाटते की १६० ते १६५ धावा आदर्श असतील. या मर्यादेतील कोणतीही धावसंख्या स्पर्धात्मक ठरेल.”
हेही वाचा : U19 World Cup : विश्वचषकातील कामागिरीचा ‘वैभव’ सन्मान! ICC च्या सर्वोत्तम संघात लागली वर्णी; कनिष्क-हेनिल जोडीचाही समावेश
झिम्बाब्वे प्लेइंग इलेव्हन : ब्रायन बेनेट, तादिवानाशे मारुमणी, डायोन मायर्स, ब्रेंडन टेलर(विकेटकीपर), सिकंदर रझा(कर्णधार), रायन बर्ल, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुजरबानी
ओमान प्लेइंग इलेव्हन: जतिंदर सिंग(कर्णधार), आमिर कलीम, हम्माद मिर्झा, वसीम अली, करण सोनावले, जितेन रामानंदी, विनायक शुक्ला(विकेटकीपर), सुफियान मेहमूद, नदीम खान, शाह फैसल, शकील अहमद






