नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) ने दिल्ली तसेच सभोवतालच्या परिसरातील वैद्यकीय महाविद्यालयाचे रँकिंग केले आहे. यादी तयार करताना विविध पैलूंना लक्षात ठेवले गेले आहे. शिकवण्याची शैली, तद्न्य शिक्षक, स्वच्छता, सोयी सुविधा अशा अनेक मुद्द्यांना लक्षात ठेवून NRIF ने दिल्लीतील बेस्ट वैद्यकीय महाविद्यालयांची यादी तयार केली आहे.
फोटो सौजन्य - Social Media
दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIMS) ने NRIF च्या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. AIMS दिल्ली फक्त दिल्लीतील नव्हे तर देशातील टॉप मेडिकल कॉलेज आहे.
वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि सफदरजंग हॉस्पिटलला NIRF 2024 रँकिंगमध्ये १७वे स्थान मिळाले आहे. या कॉलेजचे उदघाटन २००१ साली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झाला होता.
मौलाना आझाद मेडिकल कॉलेज दिल्लीतील एक प्रतिष्ठित कॉलेज आहे. NIRF 2024 रँकिंग मध्ये महाविद्यालयने २४वा क्रमांक पटकावला आहे.
लेडी हार्डिंज मेडिकल कॉलेज या महाविद्यालयाची स्थापना १९१४ साली करण्यात आली होती. हे महाविद्यालय खासकरून महिलांच्या शिक्षणावर लक्ष देते.
युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्स दिल्लीतील एक नावाजलेले मेडिकल कॉलेज आहे. NIRF 2024 रँकिंगमध्ये या महाविद्यालयाने ३२ वा रँक पटकावला आहे.