फोटो सौजन्य - Social Media
स्पर्ध्येच्या युगात करावे काय? हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाला पडतो. आताचे काळ आणि पूर्वीचे काळ यामध्ये सर्वात मोठा फरक म्हणजे शिक्षण आहे. पूर्वीच्या काळामध्ये फार कमी लोकसंख्या शिक्षित असायची. परंतु, आताच्या काळामध्ये जवळजवळ सगळेच काही ना काही शिकलेले आहेत. जरी सर्व नसले तरी मोठी लोकसंख्या शिक्षित आहे. या वाढत्या शिक्षित लोकांच्या लोकसंख्येमुळे स्पर्धेचे वातावरण तयार होत आहे. अय वातावरणात प्रत्येक शिक्षित व्यक्तीला जगणे कठीण झाले आहे. शिक्षित तर सर्वेच आहेत त्यामुळे आपल्याला हवे ते साध्य करणे कठीण झाले आहे. आता शिक्षण तर सामान्य झाले आहे, त्यामुळे मोठमोठ्या कंपन्या उमेदवारांचे कौशल्य तितकेच पारखून घेत आहे. त्यांची ही पारख आताच्या काळामध्ये फार स्वाभाविक आहे. त्यामुळे जर तुम्ही या स्पर्ध्येच्या वातावरणात बळी जात आहात, तर स्वतःच्या कौशल्य वाढीवर भर द्या. असे काही कोर्स आहेत, जे आपल्या अंगातील कौशल्य वाढीवर भर देतात. नवीन कौशल्याने आपले ज्ञान तर वाढते, पुढे हेच ज्ञान आपल्या खिशामध्ये भर टाकण्यास कामी येते.
आजच्या काळामध्ये असे अनेक प्रमाणपत्र देणारे कोर्स आहेत. ज्यांच्या सहाय्याने अनेक उमेदवार नवनवीन कौशल्य शिकून घेत आहेत. मुळात, हे ते कोर्स आहेत, ज्यांच्या माध्यमातून शिकवले जाणारे कौशल्य काळाची गरज झाली आहेत. त्यामुळे अनेक उमेदवार त्यांना शिकून घेण्यात फार उत्स्फूर्ती दाखवत आहेत. तुम्ही ही या कौशल्यांना शिकून घेणे तुमच्या फायद्याचे ठरू शकते.
ऍनिमेशन डिझाईनिंग कोर्स
कार्टून असो वा मोठमोठे चित्रपट. अगदी जाहिरातींमध्येही ऍनिमेशनची गरज भासते. तसेच आताची पिढी मोठ्या प्रमाणामध्ये ऍनिमेशनकडे आकर्षित आहे. या संधीचा फायदा घेत, हे कौशल्य प्राप्त करणे आपल्यासाठी फार फायद्याचे ठरू शकते. देशामध्ये अनेक संस्थान आहेत जे या कौशल्याची शिकवण देतात. यामध्ये प्रवेश घेत आपण या कौशल्यांना शिकून भविष्यात चांगली कामे करू शकतात.
सायन्स स्टुडंट्स के लिए बेस्ट कोर्स
विज्ञान क्षेत्रामध्ये करिअर घडवणाऱ्या व्यक्तींसाठी काही बेस्ट पर्याय आहेत. या पर्यायांच्या माध्यमातून ते भविष्यात चांगली प्रगती करू शकतात. या स्पर्ध्येचयाच्या युगामध्ये आपल्या करिअरच्या नौकेला बुडू द्यायचे नसेल तर आजपासूनच या कोर्सबद्दल विचार करायला सुरु करा. प्रोग्रामिंग, वेबसाईट तसेच सॉफ्टवेअरसारख्या विभागांमध्ये ज्ञान मिळवण्यासाठी काही शॉर्ट टर्म कोर्स उपलब्ध आहेत, त्यांच्या माध्यमातून हे शिकून घ्या आणि सुरुवातीलाच चांगल्या पगाराची नोकरी मिळवा.
योग किंवा फिटनेस ट्रेनर
आताची तरुण पिढी आप[लय आरोग्याबाबतीत फार काळजी करते. विविध प्रकारचे योगा क्लासेस तसेच व्यायामशाळेत तरुणांची संख्या अफाट आहे. याचा फायदा घेत तुम्ही या क्षेत्रात ट्रेनर म्हणून काम करू शकता. ट्रेनर बनण्यासाठी अगोदर स्वतःला परीपक्व करावे लागेल.