Ajit Pawar Plane Crash: वेळ थांबली… ओळख मात्र घड्याळाने दिली; हातावरचे घड्याळच ठरले ओळखीचे शेवटचे साक्षीदार
Ajit Pawar Plane Crash: अजित पवार: मुख्यमंत्री पदाची हुलकावणी: एका संघर्षाचा न संपलेला प्रवास
अजित पवार यांच्या व्यतिरिक्त, अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे अपघाताच्या वेळी विमानात होते. अपघाताची माहिती मिळताच बचाव कार्यास सुरूवात झाली. घटनास्थळावरून छिन्नविछीन्न झालेले मृतदेह ताब्यात घेण्यात आले. मृतदेहांची अवस्था खूपच खराब होती. पण अजित पवार यांच्या हातातील घड्याळावरून त्यांचा मृतदेहाची ओळख झाली असल्याची माहिती समोर आली आहे. हातातील घड्याळानेच अजित पवार यांची शेवटची ओळख पटली. यावरून अपघाताच्या तीव्रतेची कल्पना येते.अजित पवार यांच्या कपड्यांवरून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. अपघाताची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून बारामतीला एक पथक रवाना झाले आहे.
Sanjay Gandhi : संजय गांधीचाही झाला होता विमान अपघातात दु:खद अंत; नेमकं काय घडलं ‘त्या’ दिवशी?
स्थानिकांनी सांगितला डोळ्यांदेखत घडलेला प्रकार
माध्यमांशी बोलताना एका महिलेने सांगितले की, बुधवारी सकाळी बारामती विमानतळावरून विमान फिरताना दिसले. हवेत काही वेळाने उड्डाण केल्यानंतर, विमान थोडे अस्थिर वाटले. लँडिंगसाठी धावपट्टीजवळ येताच ते जमिनीवर जोरात आदळले आणि स्फोट झाला. आमच्या घरापर्यंत एक मोठा आवाज ऐकू आला. स्फोटानंतर विमानाचे अनेक भाग हवेत फेकले गेले. काही तुकडे आमच्या घराजवळही पडले. विमान कोसळण्यापूर्वी एका बाजूला झुकले. आम्ही स्फोट पाहिला आणि तो भयानक होता.” असही या महिलेने सांगितले.
दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, लँडिंग दरम्यान विमानाचे संतुलन बिघडल्यासारखे दिसत होते. विमान ज्या पद्धतीने खाली उतरत होते, त्यामुळे आम्हाला वाटले की ते कोसळेल. ते धावपट्टीपासून सुमारे १०० फूट वर होते. आम्ही विमानाकडे धावत असताना, आम्हाला आगीच्या ज्वाळा दिसल्या, त्यानंतर सलग चार-पाच स्फोट झाले, ज्यामुळे आम्हाला त्याच्या जवळ जाता आले नाही.”






